Pune News: मोठी बातमी! पुण्यात अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

Ajit pawar News in Marathi: पुण्यात मराठा समाजाच्या आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील जुन्नर येथील आळेफाट्यात मराठा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
Ajit pawar News
Ajit pawar NewsSaam tv
Published On

Ajit Pawar News:

पुण्यातून मोठं वृत्त हाती आलं आहे. पुण्यात मराठा समाजाच्या आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील जुन्नर येथील आळेफाट्यात मराठा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ताफ्यासमोर 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील आज जुन्नर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, अजित पवारांच्या वाहनाचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला आहे. पवारांच्या ताफ्याला जुन्नरमधील आळेफाटा चौकात काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला.

'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणाबाजी करत अजित पवारांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे. अजित पवार यांच्यासह सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाहनाला मराठा आंदोलकांनी रोखण्याचा केला प्रयत्न केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ajit pawar News
CM Eknath Shinde: राज्यात शांतता नांदूदे..., उत्तेश्वराच्या दर्शनानंतर मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या ताब्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ही जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आळेफाटा येथे भरचौकात 'एक मराठा लाख मराठा' म्हणत अजित पवारांच्या ताफ्याला अडवून काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी काळे झेंडे दाखवणारे ठाकरे गटाचे जुन्नर तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे आणि शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे यांच्यासह सात जणांना आळेफाटा पोलीसांनी ताब्यात घेतले

Ajit pawar News
Prakash Ambedkar: 'मनाचे खेळ खेळत आहात...' मविआकडून निमंत्रण येताच प्रकाश आंबेडकर संतापले; पटोलेंवर हल्लाबोल

अजित पवारांचा शिरूर दौरा

शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हेंना पडणार म्हणजे पाडणार असं आवाहन केल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान अमोल कोल्हेंना आव्हान देण्यासाठी महायुतीकडून अद्याप उमेदवार कोण अशी चर्चा रंगली आहे. ॉ

त्यातच अमोल कोल्हेंना आव्हान देण्यासाठी तरुण चेहरा मैदानात उतरणार आहे, यासाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार शिरुर लोकसभा मतदार संघातून लढणार अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे अजित पवार शिरुर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असल्याचं बोललं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com