बोरिवली पोलीस ठाण्यातील PSI ज्ञानेश्वर पराडे ACBच्या सापळ्यात
अटक न करण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप
तडजोडीनंतर १ लाख ३० हजार रुपये स्वीकारताना PSIला रंगेहात पकडण्यात आले
५ ऑक्टोबर रोजी ACBने सापळा रचून कारवाई केली
मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. बोरिवली पोलीस ठाण्यातील PSI ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच ACBने लाच घेताना रंगेहात पकडलं. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पराडे असे या लाच घेतलेल्या PSI चे नाव असून तक्रारदार आणि त्यांच्या दोन बहिणींना अटक न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बोरीवली पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात तक्रारदार आणि त्यांच्या दोन बहिणींना अटक न करण्यासाठी PSI ज्ञानेश्वर पराडे यांनी सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोड झाल्यानंतर १ लाख ३० हजार रुपये स्वीकारण्यासाठी ज्ञानेश्वर पराडे तयार झाले.
लाचेची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने २९ सप्टेंबर रोजी ACBकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ACBच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी सुरू केली. ३० सप्टेंबर रोजी लाचेची मागणी झाल्याची ACBकडून पडताळणी करण्यात आली. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर ACBने PSI ज्ञानेश्वर पराडे यांच्याविरोधात कारवाईची तयारी केली.
यानंतर ५ ऑक्टोबर रोजी ACBने सापळा रचून कारवाई केली. यावेळी १ लाख ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना PSI ज्ञानेश्वर पराडे यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीच्या घराची झडतीही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Crime News)
या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ACBकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. दरम्यान, PSI ज्ञानेश्वर पराडे यांनी नेमकी कोणत्या प्रकरणात तक्रारदार आणि त्यांच्या दोन बहिणींना अटक न करण्यासाठी लाचेची मागणी केली होती, याबाबत अधिक तपशील तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.