Mumbai Bomb Threat  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Mumbai Police: गणेश विसर्जनादरम्यान मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मेसेज करणाऱ्याला नोएडा येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीला मुंबईत आणण्यात आले आहे.

Priya More

मुंबईमध्ये गणपती विसर्जनादरम्यान बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एकाला अटक केली. ५० वर्षीय अश्विन कुमार सुप्राने मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. आरोपीने गुरूवारी मुंबईच्या वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर हा धमकीचा मेसेज पाठवला होता. त्यानंतर मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले होते. मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला नोएडा येथून अटक करण्यात आली. आरोप अश्विन कुमार मूळचा बिहारचा रहिवासी आहे. धमकी पाठवण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाइल आणि सिम कार्डवरून पोलिस आरोपीपर्यंत पोहचले. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल आणि सिमकार्ड जप्त केले. आरोपीला अधिक चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे.

गुरूवारी मुंबईत मानवी बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांना आला होता. मुंबईच्या वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप हेल्पलाइनवर हा धमकीचा मेसेज आला होता. या धमकीच्या मेसेजमध्ये दावा करण्यात आला होता की, १४ दहशतवादी भारतामध्ये घुसले आहेत. ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असून ४०० किलोच्या आरडीएक्सच्या स्फोटाद्वारे मुंबई शहर हादरवले जाईल. या धमकीच्या मेसेनंतर मुंबईतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.

आरोपीने धमकीच्या मेसेजमध्ये त्याच्या संघटनेचे नाव लष्कर-ए-जिहादी असल्याचे सांगितले होते. या मेसेजनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. त्याला नोएडा येथून ताब्यात घेण्यात आले आहेत. सध्या पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत. वरळी पोलिस ठाण्यात या व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम ३५१ आणि उपक्रम २,३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांनी अशा धमकीच्या खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT