
गुजरात एटीएसने AQIS शी संबंधित मोठ्या दहशतवादी कटाचा केला भंडाफोड
दिल्ली, नोएडा आणि गुजरात येथून ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
सैफुल्ला कुरेशी, मोहम्मद फर्दीन, मोहम्मद कैफ आणि झिशान अली अशी अटकेतील दहशतवाद्यांची नावं
भारतात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा आखला होता कट
देशानं दहशतवादविरोधी लढाई तीव्र केली असून, गुजरात एटीएसला मोठं यश मिळालं आहे. एटीएसच्या पथकानं एका मोठ्या दहशतवादी कटाचा भंडाफोड केला आहे. अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेंट अर्थात AQIS शी संबंधित मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. देशाची राजधानी दिल्ली, लागूनच असलेल्या नोएडा आणि गुजरातमधून एटीएस पथकाने एकूण चार संशयित दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांमध्ये दोघे गुजरातचे, दिल्लीमधून एक आणि उत्तर प्रदेशातील नोएडातून एक असे एकूण चौघांचा समावेश आहे. हे सर्व दहशतवादी अल कायदाच्या एक्यूआयएसशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
एटीएस पथकाने अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांनी ओळख पटवण्यात आली आहे. (AQIS Terror Suspects Arrested) सैफुल्लाह कुरैशी, मोहम्मद फर्दीन, मोहम्मद कैफ आणि झिशान अली अशी त्यांची नावे आहेत.
गुजरात एटीएसकडून अटक करण्यात आलेल्या चार दहशतवाद्यांशी संबंधित धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एटीएस पथकानं दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी हे २० ते २५ वयोगटातील आहेत. भारतात दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखत होते. एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. लवकरच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संपूर्ण कारवाईशी संबंधित सविस्तर माहिती सार्वजनिक करण्यात येणार आहे.
गुजरात एटीएसच्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना काही विशेष आणि संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करण्याचे निर्देश मिळाले होते. या चारही संशयित दहशतवादी हे सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. सीमेपलीकडील दहशतवाद्यांशीही त्यांचा संपर्क होता, अशी माहितीही समोर आली आहे.
चार संशयित दहशतवाद्यांना केलेली अटक ही तपास यंत्रणांचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. गुजरात एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणा या मॉड्युलचे नेटवर्क, फंडिंग, ट्रेनिंग आणि विदेशी संपर्क असे सर्व संबंध शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी काही दिवसांत या प्रकरणात मोठे कट उघडकीस येतील, तसेच अनेकांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अटक केलेले संशयित दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत?
हे सर्व आरोपी ‘अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेंट (AQIS)’ या दहशतवादी मॉड्युलशी संबंधित आहेत.
एटीएसने अटक केलेल्या आरोपींची नावं काय आहेत?
सैफुल्ला कुरेशी, मोहम्मद फर्दीन, मोहम्मद कैफ आणि झिशान अली अशी त्यांची नावं आहेत.
४ संशयित दहशतवाद्यांना कुठून अटक करण्यात आली?
उत्तर: दिल्ली, नोएडा (उत्तर प्रदेश) आणि गुजरात येथून या चौघांना अटक करण्यात आली.
या दहशतवाद्यांचा हेतू काय होता?
भारतात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.