
संसदेच्या अधिवेशनात आम्हाला बोलू दिले जात नाही असा आरोप करणारे काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी ऑपरेशन सिंदूरवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) बाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर चर्चा होईल असे आम्हाला सांगण्यात आलंय, याकडंही राहुल गांधींनी लक्ष वेधलंय.
राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूरवरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. आम्ही युद्धविराम घडवून आणला असं डोनाल्ड ट्रम्प हे २५ वेळा बोलले आहेत. ते वास्तवही आहे आणि ते काही लपून राहिलेलं नाही. पण युद्धविराम घडवून आणणारे ट्रम्प कोण, असा आमचा सवाल आहे. हे त्यांचं काम नाही. मात्र, पंतप्रधान मोदींनी एकदाही उत्तर दिलेलं नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
एकीकडं तुम्ही सांगताय की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. दुसरीकडं सांगताय की आमचा विजय झालाय. दोन्ही गोष्टी एकाचवेळी होऊ शकत नाही. ट्रम्प म्हणतात की आम्ही युद्धविराम घडवून आणला. याचा अर्थ दाल मे कुछ काला है....आमच्या परराष्ट्र धोरणाच्या ठिकऱ्या उडवल्या जात आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या काळात एकाही देशानं आपलं समर्थन केलं नाही. कुणीही पाठिंबा देण्यासाठी पुढं सरसावलं नाही, असं टीकास्त्र राहुल गांधींनी डागलं.
बिहारमधील एसआयआरवर काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी यावेळी बिहारमधील विशेष मतदार पुनर्तपासणीसंदर्भातील प्रश्नावरही भाष्य केले. हे ५२ लाख मतदारांबद्दल नाही किंवा बिहारबद्दल नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत घात झाला. मतदार याद्या दाखवा अशी विचारणा आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे, पण आम्हाला मतदार याद्या दाखवण्यात आल्या नाहीत. व्हिडिओग्राफी दाखवा असं सांगितलं तर व्हिडिओग्राफीचा कायदाच बदलण्यात आला. महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदार आले होते, पण तिथे निवडणूकच चोरीला गेली. आता आम्ही कर्नाटकातही रिसर्च केला. तिथे तर भयंकर चोरी पकडण्यात आली आहे. मी ते ब्लॅक अँड व्हाइटमध्ये दाखवू शकतो, असंही राहुल गांधी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.