Mumbai Mayor Saam tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! मुंबईचा महापौर ठरला, भाजपकडून या लाडक्या बहिणीला दिली संधी

Ritu Tawde appointed as Mumbai Mayor : मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे शिवसेनेचे सरकार स्थापन होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपकडून रितू तावडे महापौर तर शिंदे गटाकडून संजय घाडी उपमहापौर असणार आहेत.

Namdeo Kumbhar

Mumbai Municipal Corporation mayor deputy mayor news : मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेंचे सरकार बसणार, यावर शिक्कामोर्तब झालेय. कारण, मुंबईत भाजपचा महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर बसणार हे आज निश्चित झालेय. भाजपकडून महापौरबदासाठी रितू तावडेंचं नाव निश्चित करण्यात आले. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी संजय घाडी (Sanjay Gadi named Deputy Mayor of Mumbai) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (BMC mayor deputy mayor announcement) भाजप अन् शिंदेंची शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असल्याने रितू तावडे अन् संजय घाडी यांच्या नावावर लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

२२७ जागांपैकी भाजपने ८९, ठाकरेंची शिवसेना ६५, शिंदेंची शिवसेना २९, काँग्रेस २४, मनसे ६, अजित पवारांची राष्ट्रवादी ३, शरद पवारांची राष्ट्रवादी १, एमआयएम आणि इतर १० जागांवर निवडून आले आहेत. भाजप ८९ जागांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना ६५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ११४ जागांची आवश्यकता असते. भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीने हा आकडा पार केला आहे. मार्च २०२२ पासून मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होती, ती आता या नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांमुळे संपुष्टात येईल. लवकरच नव्या महापौराचा शपथविधी पार पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naneghat Waterfalls: मुसळधार पावसाने खुललं नाणेघाटाचं सौंदर्य; धबधबे, धुकं अन् हिरवाई अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Heavy Rain: रायगड जिल्ह्यात मुसळधार, अंबा नदीनं ओलांडली धोका पातळी; पोलादपुरात दरड कोसळली, नागरिकांचं स्थलांतर

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील बेलापूर येथील इन्कम टॅक्स कॉलनीत पाणी साचले; नागरिकांचे हाल

Rajmachi Landslide: मोठी बातमी! राजमा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळली; 100 पर्यटक अडकले

EPFO Update : EPFO ने बदलले नियम; आता UMANG अॅपवर मिळतील 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT