Mumbai Crime Saam TV News
मुंबई/पुणे

'तुझ्या आई-वडिलांना ठार मारेन', ५० वर्षीय शिक्षकानं १७ वर्षीय तरूणीचे लचके तोडले; मुंबई हादरली

Mumbai Crime News: खासगी ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आई वडिलांना जीवे ठार मारेन अशी धमकी देत तरूणीचे लचके तोडले. ही धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली आहे.

Bhagyashree Kamble

शिक्षक पेशाला काळिमा फासणारी घटना भाईंदरमधून समोर येत आहे. खासगी ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी ५० वर्षांचा असून, त्याने १७ वर्षीय मुलीचे लचके तोडले आहेत. या घटनेची पालकांना समजताज त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास करीत आरोपीला अटक केली असून, पुढील तपाल सुरू आहे.

लकी राय उर्फ पुणेनद्रु योगेंद्रनाथ राय (वय वर्ष ५०) असे आरोपीचे नाव आहे. तो भाईंदर येथील प्रसिद्ध क्लासेसचा शिक्षक आहे. तर, पीडित तरूणी एफवाय.बीएमध्ये शिक्षण घेत आहे. २०२३ साली तरूणीची नराधम शिक्षकाची भेट झाली. त्यानंतर २०२४ साली तिने नराधमाच्या खासगी ट्युशनमध्ये प्रवेश घेतला. त्याने आधी तरूणीचं विश्वास संपादन केलं. करिअरमध्ये यश मिळवून देईन असं सांगत त्याने विश्वास दिला. त्यानंतर त्याने तरूणीसोबत जवळीक साधली.

नंतर तिचे लैंगिक शोषण केले. आई वडिलांना जीवे ठार मारेन, असं धमकी देत तो तरूणीसोबत अत्याचार करीत राहिला. या भीतीपोटी तरूणी देखील गप्पपणे सगळं सहन करीत राहिली. अखेर धमक्यांना कंटाळून पीडितेन आपल्या आई वडिलांना यासंदर्भात माहिती दिली. कुटुंबाला याची माहिती मिळताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

पीडितेच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नवघर पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी तपास करून नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. भाईंदर पूर्व भागात नराधमाचे प्रसिद्ध क्लासेस आहे. या क्लासेसमध्ये शेकडो विद्यार्थी प्रवेश घेतात. पीडितेसारख्या आणखी कोणत्या मुलीसोबत नराधमाने असे दुष्कृत्य केले आहे का? याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, शेतकरी धास्तावले

SCROLL FOR NEXT