BJP: भाजप नेत्याचा मृतदेह बाल्कनीत आढळला, हातही बांधलेले होते; परिसरात खळबळ

BJP Leader Death: पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते शेख बकीबुल्ला यांचा मृतदेह घराच्या बाल्कनीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. कुटुंबाचा आरोप, ही आत्महत्या नसून हत्या आहे. पोलीस तपास सुरु.
Crime
CrimeSaam Tv
Published On

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे मंडल अध्यक्षाचा मृतदेह त्यांच्या घराच्या बाल्कनीत लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील गोघाट परिसरातून उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या दोन्ही हातांना दोरीने बांधण्यात आले होते, त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सानबंदी परिसरातील त्यांच्या राहत्या घरात कुटुंबीय जागे झाले असता, त्यांनी बकीबुल्ला यांचा मृतदेह बाल्कनीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यांचे दोन्ही हात दोरीने बांधलेले होते. हत्या करून मृतदेह लटकवल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

Crime
Buldhana: वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती अन् लैंगिक अत्याचार; सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ..पती, सासू, नणंद अटकेत

या घटनेनंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत, ही एक राजकीय हत्या असून बकीबुल्ला यांना संपवण्यात आल्याचा आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळताच गोघाट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

Crime
Viral: पडदे न लावता हॉटेल रुममध्ये शारीरिक संबंध ठेवणारे कपल कोण? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांचा कडक इशारा

पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला असून, ही आत्महत्या आहे की हत्या, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कुटुंबीयांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com