Bhaskar Jadhav Responded to Narayan Rane Saam Tv News
मुंबई/पुणे

राणेंचा ठाकरेंवर वार, जाधवांचे शब्दांचे प्रहार, जाधवांनी राणे पिता-पुत्रांना सुनावलं; नितेश राणें 'नेपाळी वॉचमन' ?

Bhaskar Jadhav Responded to Narayan Rane : ठाकरेंची साथ सोडण्याची चर्चा असतानाच भास्कर जाधवांनी राणे कुटुंबाला शिंगावर घेत कडवट टीका केलीय. मात्र भास्कर जाधव एवढे का भडकले? आणि त्यांनी राणेंवर काय टीका केलीय?

Prashant Patil

मुंबई : ठाकरेंची साथ सोडण्याची चर्चा असतानाच भास्कर जाधवांनी राणे कुटुंबाला शिंगावर घेत कडवट टीका केलीय. मात्र भास्कर जाधव एवढे का भडकले? आणि त्यांनी राणेंवर काय टीका केलीय? पाहूयात....

जाधवांचे शब्दांचे प्रहार

राणेंनी स्वत:चा पक्ष काढला आणि एक वर्षात आपला पक्ष का सोडला?

तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला?

राणे तुम्ही भाजपच्या चिपळूणच्या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांना इशारा का दिला?

हा संताप आहे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा, आणि त्यांच्या संतापाला कारण ठरलीय ती दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यावरून नारायण राणेंनी केलेली टीका. राणे पिता-पुत्र यांच्यावर निव्वळ शब्दांचे प्रहार करून भास्कर जाधव थांबलेले नाहीत तर त्यांनी राणेंना काही सवालही केले आहेत.

नारायण राणेंचा ठाकरेंवर वार

मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही ! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती.

एकीकडे भास्कर जाधव ठाकरेंच्या विरोधात सातत्यानं आपली नाराजी व्यक्त करत आले आहेत एवढंच नव्हे तर ते ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या जोरदार चर्चाही सुरू आहे त्यामुळेच जाधवांनी उद्धव ठाकरेंवरील टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देऊन पुन्हा आपली पक्षनिष्ठा दाखवून दिलीय का? की या टीकेच्या निमित्तानं पुन्हा कोकणातली वर्चस्वाची नवी खेळी खेळली आहे..?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 31 जुलैला नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

Harihar Fort history: महाराष्ट्रातील एक धोकादायक किल्ला! वाचा हरिहर किल्ल्याच्या नावाचा रहस्यमयी इतिहास

Mumbai : मुंबईकरांची मोठी अडचण कायमची मिटली! ३ नवीन महाप्रकल्प सेवेत; पाहा तुमचा कोणता प्रवास सोपा होणार?

Nagpur Fort : नागपूरच्या मध्यभागी उभा असलेला शौर्याचा साक्षीदार, 'या' किल्ल्यावर गेल्यावर अनुभवा समृद्ध इतिहास

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरमधील यशच्या 'त्या' सीनची तुफान चर्चा; प्रेक्षक करतायत भरभरून कौतुक, वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT