Mumbai commuters struggle as auto drivers overcharge amid BEST bus strike disruption saam tv
मुंबई/पुणे

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

BEST Strike Sparks Auto Fare Loot in Mumbai: मुंबईतील मुजोर रिक्षाचालकांकडून प्रवाश्यांच्या लुटीचं सत्र काही थांबत नाहीये. अशातच आता बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं पुन्हा एकदा रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडं आकरलं जातंय. त्यामुळे मुजोर रिक्षाचालकांच्या मनमानीचा प्रश्न ज्वलंत झालाय. पाहा यावरचा हा रिपोर्ट...

Saam Tv

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांनी ऐनवेळी संपाची हाक दिल्यानं मुंबईकराचे चांगलेच हाल सुरू आहेत. बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यानं बससेवेचा पुरता बोजवारा उडालाय. मुंबईतल्या अनेक ठिकाणी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना हक्काची बेस्ट बस नसल्यानं मनस्ताप सहन करावा लागलाय.

याच संपाचा गैरफायदा उचलण्यासाठी लुटारू रिक्षाचालक गिधाडासारखे टपून बसले आहेत. आणि त्यामुळेच मुंबईकरांची लूट या मुजोर रिक्षाचालकांनी सुरू केलीय. याचंच साम टीव्हीनं स्टिंग ऑपरेशन केलं असून यात या लुटारू रिक्षाचालकांच्या लुटीचा पर्दाफाश झालाय. २-३ किलोमीटरच्या अंतरासाठी हे रिक्षाचालक प्रवाशांकडून चक्क १५० ते २०० रुपये वसूल करत असल्याचं या साम टीव्हीच्या स्टिंगमध्ये बिंग फुटलंय.

पाहिलंत...अव्वाच्या सव्वा भाडं आकारणं, जवळचं भाडं नाकारणं... हे सगळं मुंबापुरीत अगदी राजरोस पणे सुरु आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांना या मुजोर रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराला सामोरं जावं लागलंय. मात्र, प्रशासनाला याचं काही देणंघेणं नाहीये. त्यामुळे प्रवाशांना लुटणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांवर प्रशासन कधी कारवाई करणार, हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Purandar Fort : पुण्याजवळील ऐतिहासिक पुरंदर किल्ला, 'या' गोष्टी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

महिनाभर रोज न चुकता करा योगा, शरीरात होतील आश्चर्यकारक 5 बदल

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT