Mumbai rocket firecracker ban from November 9 to November 25 2026 saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत रॉकेट फटाके उडवण्यावर बंदी! महापालिका आयुक्तांचा मोठा निर्णय; प्रशासनाकडून आदेश जारी

Mumbai Firecracker Ban: दिवाळीतील आगीच्या घटना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने शहर आणि उपनगरांमध्ये रॉकेट तसेच आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत बंदी घातली आहे. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

Bharat Jadhav

  • ९ नोव्हेंबर २०२६ पासून २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत बंदी लागू

  • मुंबई महापालिका हद्दीतील सार्वजनिक आणि खासगी अशा सर्व ठिकाणी हा आदेश लागू

  • इतर फटाक्यांवर सरसकट बंदी नाहीये

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या आगीच्या घटना आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतलाय. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रॉकेट तसेच आकाशात उडणाऱ्या बॉम्ब फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आलीय. मुंबई महापालिका आयुक्त तथा शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी यासंदर्भात आदेश जारी केलेत.

या आदेशानुसार, ९ नोव्हेंबर २०२६ पासून २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. मुंबई महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक आणि खासगी ठिकाणी रॉकेट फटाके उडवण्यास मनाई करण्यात आलीय.

नेमकी बंदी कुठे लागू असणार?

मुंबईतील निवासी इमारती, टेरेस, गच्ची, बाल्कनी, अंगण, खिडक्या, वाहनतळ तसेच झोपडपट्टी परिसरातही रॉकेट फटाके उडवता येणार नाहीत. रॉकेट फटाक्यांचे जळते अवशेष इमारतींच्या छतावर, बाल्कनीत किंवा खिडक्यांमध्ये पडल्यामुळे आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात उंच इमारती आणि झोपडपट्टी परिसर मोठ्या प्रमाणात आहेत. अशा ठिकाणी रॉकेट फटाक्यांमुळे आग लागल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. ही शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात येत आहेत.

बंदीची अंमलबजावणी कोण करणार?

या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी परिमंडळीय पोलीस उपायुक्त, मुंबई महापालिकेचे विभागीय सहाय्यक आयुक्त आणि अग्निशमन दलावर सोपवण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांना बंदीचे पालन सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वास्तुशास्त्रानुसार चप्पल आणि बूट ठेवण्याची योग्य दिशा कोणती?

Amla Oil: केसगळती कमी करून केसांना बनवा मजबूत आणि चमकदार! घरीच बनवा 'हे' तेल

Maharashtra News Live Update: पुण्यात पेट्रोल-डिझेल टंचाईचे सावट? पेट्रोल डीलर्स असोसिएशनकडून चिंता व्यक्त

Gokul President Election: मतदान आणि निकाल एकाच दिवशी लागणार! गोकुळच्या अध्यक्ष निवडणुकीवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Hotel Rooms Safety Tips For Couple: हॉटेलच्या रूममध्ये राहण्यापूर्वी कपल्सने तपासून घ्या 5 महत्वाच्या गोष्टी, नाहीतर नंतर होईल पश्चात्ताप

SCROLL FOR NEXT