ED arrests Mumbai bank officer in ₹16 crore fraud involving 127 accounts Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Bank Scam : बँकेत मोठा फ्रॉड! १२७ खात्यामधून कोट्यवधी लंपास, ईडीने मुंबईच्या अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

Mumbai bank officer ₹16 crore fraud details : वांद्रेमधील बँकेत तब्बल १६ कोटींचा घोटाळा झालाय. १२७ खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या बँक अधिकाऱ्याला ईडीने अहमदाबादमध्ये अटक केली. या घोटाळ्यात आणखी एक अधिकारीही सामील असल्याचे उघड झाले आहे.

Namdeo Kumbhar

  • मुंबईतील बँकेत तब्बल १६ कोटींचा घोटाळा उघड झाला आहे.

  • १२७ खातेदारांच्या पैशावर अधिकाऱ्याने डल्ला मारल्याचे उघड झालेय.

  • ईडीने आरोपी हितेश सिंगला याला अहमदाबादमध्ये अटक केली.

  • या प्रकरणात आणखी एक बँक अधिकारी सामील असल्याचे समोर आले.

ED action against money laundering in Mumbai bank OF India bandra branch : १२७ जणांच्या बँक खात्यामधून तब्बल १६ कोटी रूपये लाटणाऱ्या मुंबईतील एका बँक कर्मचाऱ्याला ईडीने बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद जंक्शनवर एका धावत्या ट्रेनमध्ये ईडीने सापळा रचत आरोपी हितेश सिंगला याच्या मुसक्या आवळल्या आहेत. हितेश हा बँक ऑप इंडियाच्या वांद्रे येथील टर्नर रोडवरील शाखेमध्ये कार्यकरत होता. सिंगला याने शिताफिने १२७ बँक खातेदारांच्या पैसावर डल्ला मारला. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, अल्पवयीन, मृत व्यक्ती आणि निष्क्रिय किंवा निष्क्रिय खात्यांचा समावेश आहे.

आरोपी सिंगला याने खातेदारांच्या परवानगीशिवाय तब्बल १६ कोटी रूपये लंपास केले. मुदत ठेवी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाती, बचत बँक (एसबी) आणि चालू खात्यामधून सिंगला याने थोडे थोडे असे १६ कोटी रूपयांवर डल्ला मारला. सिंगला याने १२७ खातेदारांचे पैसे चोरून आपल्या एसबीआयमधील खात्यात ट्रान्सफर केले होते. ईडीकडून याबाबतचा तपास केला जात आहे. ईडीने यामध्ये सहभागी असलेल्या आणखी एका बँक अधिकाऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. सिंगला याने त्या अधिकाऱ्याला १.५ कोटी रूपये दिले होते.

बँकेत ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने सिंगला याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बँकेने त्याचे निलंबन केले होते. सिंगला याच्यावर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. सिंगला गेल्या काही दिवसांपासून फरार होता. ईडीने त्याचा शोध सुरू केला होता.

सिंगला अहमदाबादला येणार असल्याची टीप ईडीला मिळाली. सिंगला उज्जैनवरून अहमदाबादला येणार असल्याची माहिती मिळताच ईडीने फिल्डिंग लावली. इंदूर-वेरावळ महामना एक्सप्रेसमध्ये ईडीने सापळा रचला. अहमदाबादमधील स्थानिक ईडीसोबत संपर्क करत ईडीने सिंगला याला बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jacqueline Fernandez: भिवंडीच्या चिमुकल्यासाठी जॅकलिन बनली देवदूत; लाखमोलाची केली मदत, वाचा सविस्तर

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी नेपाळसारखं नेत्यांना तुडवावं लागेल, तुपकार यांचं वादग्रस्त विधान

Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; खेडकर कुटुंबाचा चालकाला अटक, कुटुंबीय अद्याप फरार

Maharashtra Live News Update: - आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी धरणे आंदोलन

Face Wash Tips: चेहरा सुंदर दिसण्यासाठी किती वेळा धुवावा?

SCROLL FOR NEXT