एकच नंबर! फक्त ६१ रूपयात १००० चॅनेल, सरकारी कंपनीची भन्नाट ऑफर, वाचा अॅक्टिव्हेशनची प्रोसेस

How to get 1000 TV channels for just 61 rupees with BSNL : टीव्ही चॅनेल अन् ओटीटीसाठी तुम्ही शेकडो, हजारो रूपये खर्च करताय? पण आता हे सर्व फक्त ६१ रूपयांमध्ये सरकारी कंपनी देणार आहे. पाहूयात कशी सर्व्हिस घेता येईल, आपल्या टीव्हीवर कसं अॅक्टिव्ह करता येईल.
BSNL
How to get 1000 TV channels for just 61 rupees with BSNL
Published On
Summary
  • BSNL ने फक्त ६१ रुपयांत टीव्हीसाठी नवीन सर्व्हिस सुरू केली.

  • १००० हून अधिक SD व HD चॅनल्स आणि OTT कंटेंट मिळतो.

  • प्लॅन अॅक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांकडे Bharat Fiber (FTTH) कनेक्शन अनिवार्य

  • स्वतंत्र सेट टॉप बॉक्स मिळणार नाही, वाचा नेमकं काय आहे हा बीएसएनएलचा प्लॅन

How to get 1000 TV channels for just 61 rupees with BSNL : जवळपास प्रत्येकाच्याच घरात टीव्ही आहे. त्यावरील चॅनेल अन् ओटीटीसाठी कमीत कमी ३०० ते ४०० रूपये खर्च करावे लागते. इतकेच नाही तर यामध्ये एचडी अन् ओटीटी घ्यायचे म्हटले तर हा खर्च ५०० ते १००० रूपयांच्या आसपास जातोच. पण हीच सर्व्हिस फक्त ६१ रूपयांमध्ये मिळाली तर? तुम्हाला यावर विश्वास नसेल पण हे खरे आहे. सरकारी कंपनी बीएसएनएलकडून नवीन स्कीम लाँच केली जात आहे. फक्त ६१ रूपयांमध्ये १०० चॅनल असणारा प्लॅन BSNL ने लाँच केला आहे. नेमका हा प्लॅन आहे काय? अॅक्टिव्ह कसा करायचा? याबाबत जाणून घेऊयात...

IFTV अथवा BiTV नेमकं काय आहे ?

iFTV म्हणजे Integrated Fibre TV होय. तर BiTV म्हणजे Bharat Internet TV. ही BSNL ची डिजिटल टीव्ही आणि OTT सर्व्हिस आहे. यामध्ये तुम्हाला ५०० पेक्षा जास्त लाईव्ह SD आणि HD चॅनेल पाहायला मिळतील. त्यामध्ये हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषांच्या चॅनेलचा समावेश असेल. त्याशिवाय Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar यासारखे प्रसिद्ध OTT प्लेटफॉर्म्सवरील काँटेंटही यावर उपलब्ध असेल. विशेष म्हणजे, याची सुरूवातीची किंमत फक्त ६१ रूपये इतकी असेल. या नव्या ऑफरबाबत BSNL ने एक्स खात्यावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

सर्व्हिस कशी सुरू कराल? वाचा

BSNL ने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत सर्व्हिस नेमकी कशी सुरू करायची हे सांगितले आहे. 18004444 क्रमांकावर अथवा WhatsApp वर तुम्हाला संपर्क करावा लागेल. त्यानंतर Hi लिहावे लागेल. तुम्हाला सर्व्हिसबाबत मेन्यू दिला जाईल. त्यामधील तुम्हाला हवी असणारी सर्व्हिस Activate IFTV ची निवड करावी लागेल.

BSNL
नागपूरमध्ये कंत्राटदाराची आत्महत्या, शरद पवारांच्या नेत्याला ठोकल्या बेड्या, विदर्भाच्या राजकारणात खळबळ!

अतिशय महत्त्वाचं -

IFTV चा वापर करण्यासाठी तुमच्याकडे BSNL च्या Bharat Fiber चे (FTTH) कनेक्शन असणं अनिवार्य आहे. ज्याच्याकडे ब्रॉडबँड प्लॅन आहे, त्यावरच ही सर्व्हिस काम करते. युजर्सकडे ब्रॉडबँडचा योग्य तो प्लॅन असणं गरजेचं आहे, त्याशिवाय इंटरनेटचा स्पीड व्यवस्थित असावा. IFTV साठी स्मार्ट टीव्ही, Android TV अथवा Fire Stick यासारखे डिवाइस (उपकरण) असणं गरजेचं आहे. कारण, या सर्व्हिसला सुरू केल्यानंतर ग्राहकाला वेगळा सेट टॉप बॉक्स देण्यात येणार नाही. टीव्ही Skypro अथवा PlayboxTV अॅप ग्राहकाला इंस्टॉल करावे लागेल. या अॅपच्या मदतीने युजर्स FTTH क्रमांकावरून लॉगइन करतील. ही सर्व्हिस फक्त BSNL नेटवर्कसाठीच आहे.

BSNL
Maharashtra Rain : महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होणार का? जाणून घ्या सरकारचे A टू Z निकष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com