Bandra Mount Mary Fair Woman Arrested After Biting Female Police Constable AI image
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत महिलेचा दारू पिऊन धिंगाणा, बंदोबस्ताला असलेल्या पोलिसाच्या हाताचा घेतला चावा

Mumbai Police Bandra Mount Mary Fair Update News : माऊंट मेरी जत्रेदरम्यान वांद्र्यात गोंधळ घालणाऱ्या महिलेने ताब्यात घेताना महिला पोलीस शिपाई यशोदा चौगुले यांच्या दंडाला चावा घेतला. निकी जसिंग्टोला अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • माऊंट मेरी जत्रेदरम्यान वांद्रे परिसरात एका महिलेने गोंधळ घातला

  • महिलेने महिला पोलीस शिपाई यशोदा चौगुले यांच्या दंडाला चावा घेतला

  • या घटनेत यशोदा चौगुले जखमी

  • आरोपी महिलेवर गुन्हा दाखल

साक्षी यादव, मुंबई

माऊंट मेरी जत्रेदरम्यान वांद्रे परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. नशेत असलेल्या एका महिलेने पोलिसांशी हुज्जत घालत असताना महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या दंडाला चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात वांद्रे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई यशोदा चौगुले जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी निकी जसिंग्टो या महिलेला पोलिसांनी अटक केली असून, तिच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माऊंट मेरी जत्रेदरम्यान एक महिला परिसरात गोंधळ घालत असल्याची माहिती वांद्रे पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संबंधित महिलेला सुरुवातीला शांत करण्याचा प्रयत्न केला.

तसेच, गोंधळ न घालता तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, महिलेने पोलिसांचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी परिस्थिती आणखी चिघळली. पोलिसांकडून ताब्यात घेत असताना निकी जसिंग्टो हिने महिला पोलीस शिपाई यशोदा चौगुले यांच्या दंडाला चावा घेतला. या हल्ल्यात चौगुले जखमी झाल्या. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत अटक केली.

माऊंट मेरी जत्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचवेळी पोलिसांशी गैरवर्तन करत महिला पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी निकी जसिंग्टो हिच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून तिला जखमी करणे, या आरोपांखाली कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अकोला जिल्ह्यात बजाज फायनान्सविरोधात वंचित बहुजन आघाडीचे लोटांगण आंदोलन

Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

भाजपला मोठा धक्का! गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकारणात खळबळ|VIDEO

Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन; जिल्हाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT