police  Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत ड्रग्जविरोधात मोठी कारवाई; साकीनाक्यातून पेडलरच्या मुसक्या आवळल्या

mumbai news : मुंबईत ड्रग्जविरोधात मोठी कारवाई केली आहे. साकीनाक्यातून पेडलरला मुसक्या आवळल्या आहेत.

Saam Tv

मुंबईत ड्रग्जविरोधात मोठी कारवाई

मुंबई पोलिसांकडून ड्रग्स तस्करांविरोधात कडक कारवाई

200 एक्स्टसी गोळ्यांसह पेडलर अटक

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलने मोठी कारवाई करत इरफान अली अंसारी या ड्रग्स पेडलरला अटक केली आहे. साकीनाका परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून तब्बल 200 एक्स्टसी (MDMA) गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गोळ्यांची किंमत सुमारे 26 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवर झालेल्या म्युझिक इव्हेंटमध्ये ड्रग्स ओव्हरडोजमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ड्रग्स तस्करांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला इरफान अली अंसारी हा देखील त्या नेस्को म्युझिक शोमध्ये उपस्थित होता, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या मृत्यू प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, इरफान अली अंसारी याला यापूर्वी 2021 साली नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. त्याने चार वर्षांचा तुरुंगवास भोगला असून तो वर्षभरापूर्वीच जामिनावर बाहेर आला होता.

पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल फोनही जप्त केला आहे. या मोबाईलमधून पार्टीत उपस्थित असलेल्या अनेक लोकांचे संपर्क क्रमांक मिळाले आहेत. आता पोलिस या आधारे तपास करत आहेत की, नेस्को इव्हेंटमध्ये ड्रग्स पुरवठा याच्याकडून झाला होता का, तसेच त्याने हे ड्रग्स कुठून आणले.

इरफान अली अंसारीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

SCROLL FOR NEXT