Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत दोन गटांमध्ये तुफान हाणामारी; तिघेजण गंभीर जखमी , १५ ते १७ जणांवर गुन्हा दाखल

Mumbai Andheri Crime News : अंधेरी पूर्व पुनमनगर येथे माथाडी कामाच्या वादातून दोन गटांत तुफान मारामारी. १५ ते १७ जणांनी मिळून तिघांना मारहाण करून सोन्याची चेन गहाळ केली . एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • अंधेरीत माथाडी कामावरून दोन गटांमध्ये हल्ला

  • हात, लाकडी बांबूने मारहाण, दुर्घटनेत तीन जखमी

  • सोन्याची ₹1 लाख किंमतीची चेन गहाळ

  • एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

संजय गडदे, मुंबई

अंधेरी पूर्व पुनमनगर सहकार भंडार परिसरात माथाडी काम मिळवण्याच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान मारामारी झाली. यामध्ये दत्ता परब, रोहित मस्के, मोहन मोहिते, बडा कन्ना, छोटा कन्ना, कुमार आणि सत्या यांच्यासह त्यांच्या गटातील १५ ते १७ जणांनी मिळून तीन जणांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार ५ डिसेंबर रोजी उघडकीस आला. या सर्व प्रकरणात बाबू सुतार यांच्या गटातील सुनिल बालगीर, दानिश सय्यद आणि अक्षय यांना गंभीर मारहाण झाल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंदवली गेली आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्याला जयसिंग माळी यांनी सकाळी साईटवर बोलावले. त्यानंतर तो आणि सुनिल बालगीर महिंद्रा मराजो कारने पुनमनगर येथील बाबू सुतार यांच्या कामाच्या साईटवर पोहोचले. तेथे दत्ता परब आणि जयसिंग माळी यांच्यात ‘या साईटवरील माल कोण उतरवणार’ यावरून वाद सुरू होता. काही वेळाने दत्ता परबने फोन केल्यानंतर ४–५ गाड्यांमधून रोहित मस्के, मोहन मोहिते, बडा कन्ना, छोटा कन्ना, कुमार, सत्या व त्यांचे साथीदार असे १५ ते १७ जण घटनास्थळी दाखल झाले.

यानंतर दत्ता परबने जयसिंग माळी यांची कॉलर पकडत धमकावत भांडण सुरू केले. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारासह सुनिल आणि अक्षय यांना आरोपींनी हाताने मारहाण केली. दत्ता परबने लाकडी बांबू उचलून तक्रारदार आणि सुनिल यांच्यावर हल्ला केला. दानिश सय्यद यांनाही शिवीगाळ करून बांबू व हाताने मारहाण करण्यात आली.

हल्ल्यानंतर बडा कन्ना याने दानिश सय्यद यांना “औषधोपचार करतो” म्हणून पांढऱ्या इनोव्हा क्रिस्टा कारमध्ये जबरदस्ती बसवले. मात्र विरोध केल्यावर जोगेश्वरी पूर्व येथील मॉरिस गॅरेजजवळ त्यांना खाली उतरवून आरोपी पळून गेले. मारहाणीच्या वेळी दानिश यांच्या गळ्यातील अंदाजे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तुटून गहाळ झाल्याचे समोर आले. किंमत सुमारे ₹1 लाख असल्याचे सांगण्यात आले.

तक्रारदार, सुनिल आणि दानिश यांनी कूपर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनास्थळी उपस्थित जयसिंग माळी यानेही घटनेची पुष्टी केली आहे.माथाडी कामाच्या वादातून झालेल्या या हल्ल्यात आरोपी दत्ता परब, रोहित मस्के, मोहन मोहिते, बडा कन्ना, छोटा कन्ना, कुमार व सत्या यांनी मिळून शिवीगाळ, हाताने व लाकडी बांबूने मारहाण,धमकी आणि सोन्याची चेन गहाळ करून नुकसान केल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

SCROLL FOR NEXT