Shocking : शाळेत जाताना रस्ता अडवायचा, इन्स्टावर मेसेज अन्...; सिनियरच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

Akola 13 Year Girl End Life News : अकोल्यातील १३ वर्षीय मुलीच्या आत्महत्या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शाळेतील विद्यार्थ्याकडून छेडछाडीचे आरोप कुटुंबीयांनी केले असून पोलिस तपास सुरू आहे. संपूर्ण घटनेतून शाळा सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Shocking : शाळेत जाताना रस्ता अडवायचा, इन्स्टावर मेसेज अन्...;  सिनियरच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या
Akola NewsSaam Tv
Published On
Summary
  • अकोल्यातील १३ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात आत्महत्या केली

  • कुटुंबीयांनी शाळेतील मुस्लिम विद्यार्थ्याकडून त्रास होत असल्याचा आरोप केला

  • पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला

  • कुटुंबीयांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. काल सायंकाळच्या सुमारास अकोला शहरातील गिता नगर परिसरात राहत्या घरात या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या आत्महत्या मागील कारण ऐकून अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील एका मुस्लिम मुलाकडून सतत सुरु असलेल्या त्रास आणि छेडछाडीवरून आपल्या मुलींना आत्महत्या केली असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. शाळेतीलच सीनियर वर्गातील मुस्लिम मुलाच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले, असा गंभीर आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणात जुने शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Shocking : शाळेत जाताना रस्ता अडवायचा, इन्स्टावर मेसेज अन्...;  सिनियरच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या
Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

दरम्यान, काल शाळा सुटल्यानंतर मृत मुलगी घरी परतली, त्यावेळी घरी कुणीच नव्हतं. वडील देखील घरगुती कामानिमित्त बाहेर गेलेलं होते. घरातीलच दुसऱ्या मजल्यावर खोलीमध्ये तिने आतून दरवाजा बंद करून खोलीतीलच फॅनला ओढणीने गळफास घेतला आहे. थोड्यावेळाने कुटुंबातील सदस्य घरी परतले. त्यांनी तिला हाका मारल्या. मात्र तिचा आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.

Shocking : शाळेत जाताना रस्ता अडवायचा, इन्स्टावर मेसेज अन्...;  सिनियरच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या
Accident : मध्यरात्री भीषण अपघात, कार थेट ट्रकमध्ये घुसली, ४ डॉक्टरांचा जागेवरच मृत्यू

त्यामुळे कुटुंब भयभित झालं. त्यानंतर शेजारील नागरिकांच्या मदतीने तिच्या बेडरूमचा दरवाजा तोडण्यात आला. खोलीतील दृश्य पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला. तातडीने कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कुटुंबीयांनी जुने शहर पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आज शवविच्छेदन प्रक्रिया पार पडल्यानंतर अंत्यविधी पार पडणार आहे.

Shocking : शाळेत जाताना रस्ता अडवायचा, इन्स्टावर मेसेज अन्...;  सिनियरच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या
Shocking : अहिल्यानगर हादरलं! पुलाखाली आढळला ४ महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह; नेमका काय प्रकार?

मुस्लिम मुलाच्या वडिलांना केली होती तक्रार पण...

मृत मुलगी गीता नगर भागातीलच एका खाजगी शाळेत शिकायला आहे. याच ठिकाणी आपल्या मुलीला त्रास देत असल्याची माहिती कुटुंबियांनी त्या मुस्लिम मुलाच्या वडिलांना फोनवरून दिली होती. मात्र त्यानंतरही पाहिजे तसा धाक त्याच्यावर कुटुंबीयांनी दिला नव्हता. वारंवार त्याच्याकडून तिचा पाठलाग तसेच तिच्या इंस्टाग्रामवर मेसेज सुरु असायचे. दरम्यान, मृत मुलीच वय 13 वर्षीय असून त्रास देणाऱ्या मुस्लिम मुलाच वय साधारणतः 15 वर्षे असल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण प्रकारानंतर संबंधित शाळेने याकडे दखल घेऊन लक्ष देण्याची गरज असल्याचे वडिलांनी म्हटलं होतं. एकंदरीत मुलगी आमच्यातून निघून गेली. मात्र यापुढे शाळेत असे प्रकार घडू नये, याकडे विशेष लक्ष देण्यावर शालेय संस्थेने भर दिल पाहिजे, अशी विनंती मुलीच्या वडिलांनी केली.

Shocking : शाळेत जाताना रस्ता अडवायचा, इन्स्टावर मेसेज अन्...;  सिनियरच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या
Dr Babasaheb Aambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनापूर्वीच्या २४ तासांत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होईल.

या संपूर्ण प्रकरणामध्ये जुने शहर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून तिच्या आत्महत्या मागील मूळ कारण शोध घेण्याचं तपास सुरू आहे. दरम्यान, वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, अशी माहिती जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हलकर यांनी दिली आहे. मात्र, आत्महत्याच मूळ कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com