छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) मुंबई सीमाशुल्क विभाग (झोन-III) च्या अधिकार्यांनी सलग कारवाई करत तब्बल 34.20 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा (Hydroponic Weed) जप्त केला आहे. वेगवेगळ्या तीन प्रकरणांत एकूण पाच प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
सीमाशुल्क विभागाच्या माहितीनुसार, ६ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. सध्या हे पाचही आरोपी सीमा शुल्क विभागाचा ताब्यात असून त्यांची चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फुकेतहून QP 619 या विमानाने आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतून ६.३७७ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. या मालाची अंदाजे किंमत ६.३७७ कोटी आहे.
दुसरी कारवाई: बँकॉकहून 6E 1060 या विमानाने आलेल्या एका प्रवाशाकडून १७.८६२ किलो गांजा सापडला. या मालाची किंमत १७.८६२ कोटी एवढी आहे.
तिसरी कारवाई: फुकेतहून 6E 1090 या विमानाने आलेल्या तिघा प्रवाशांकडून ९.९६८ किलो गांजा जप्त झाला. या मालाची किंमत ९.९६८ कोटी आहे.
सर्व प्रकरणांमध्ये हायड्रोपोनिक गांजा प्रवाशांच्या चेक-इन ट्रॉली बॅगेमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. सीमाशुल्क अधिकार्यांनी सर्व प्रवाशांना अटक करून मादक द्रव्ये आणि मन:प्रभावी पदार्थ कायदा, १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सीमाशुल्क विभागाच्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर हायड्रोपोनिक गांजाच्या तस्करीला मोठा धक्का बसला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.