Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

Maharashtra News: महाराष्ट्रात एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयात आत्महत्या केली. शेतकऱ्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष आणि राजकीय दबाव यामुळे हा दुरदृष्टीने घेतलेला निर्णय झाला.
Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या
Published On

अस्मानी संकटानी उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला सुलतानी कारभाराचाही फटका बसतो आहे. एका तहसिलदाराच्या कृत्याने शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. चंद्रपूरच्या तहसिल कार्यालयात नेमकं काय घडलं? शेतकऱ्यानं तहसिलदारासमोरच जीवन का संपवलं?

फोटोत दिसणारे हे चंद्रपूर भद्रावती तहसील कार्यालयातच विष पिऊन आत्महत्या केलेले परमेश्वर मेश्राम शेतकरी आहेत. एका बाजूला ओल्या दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना दुसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांशी साटंलोटं करुन शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या अधिकाऱ्यांच्या रुपात जुलमी सुलतान जन्माला आलेत. न्यायालयात केस जिकूंनही तहसीलदारानं फेरफार नोंद करण्याची मागणी फेटाळून लावली.

आधीच जमिनीसाठी लढा देऊन थकलेल्या मेश्राम यांनी हार मानली. तहसीलदार कार्यालयात तहसीलदारासमोरच विष पिऊन आपलं जीवन संपवलं. मात्र परमेश्वर मेश्राम यांच्या नातेवाईकांचे आरोप अनिल धानोरकरांनी फेटाळून लावलेत. एका बाजूला आरोप प्रत्यारोप सुरु असले तरी परमेश्वर मेश्राम यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय? पाहूयात.

2006 मध्ये कुरोडा गावात मेश्राम यांची साडेआठ एकर जमीन होती. ती जमीन दिवंगत खासदार बाळू धानोरकरांना विकण्यात आली. मात्र त्यांनी पैसे दिले नाहीत. धानोरकरांनी दिलेले चेक वारंवार बाऊन्स झाले. या प्रकरणी धानोरकरांविरोधात कोर्टात केस दाखल झाली. ती केस मेश्रामांनी जिंकली. मात्र त्यानंतर तहसीलदार फेरफारवर नोंद करण्यास टाळाटाळ करत होता. यामुळेच परमेश्वर मेश्रामांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हे फक्त चंद्रपूरमध्येच नाही तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्येही मंडल अधिकाऱ्याच्या दमदाटीमुळे शेतकऱ्याने विहीरीत उडी घेत आत्महत्या केली. आता सरकारने भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरेंचं निलंबन केलं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या सेवेऐवजी राजकीय नेत्यांकडून मेवा घेत कसायासारखं शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अद्दल घडवायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com