Mumbai Airport  x
मुंबई/पुणे

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला, लँडिंगवेळी विमानाचा भाग रनवेला धडकला

Mumbai Airport News : मुंबई विमानातळावर मोठा विमान अपघात टळला आहे. लँडिग करताना इंडिगोच्या विमानाचा भाग रनवेला धडकला होता. तेव्हा लँडिग न केल्याने मोठा अनर्थ टळला.

Yash Shirke

  • मुंबई विमानतळावर इंडिगोच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला.

  • खराब हवामानामुळे विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, पण वैमानिकांनी मार्ग बदलला.

  • सर्व प्रवासी व कर्मचारी सुरक्षित असून विमानाची तपासणी सुरू आहे.

Mumbai : मुंबई विमानतळावर इंडिगो विमानाचा अपघात थोडक्यात टळला. विमानतळावर लँडिंग करत असताना इंडिगोच्या विमानाच्या मागचा भाग रनवेला धडकला. प्रतिकूल हवामानामुळे विमान कमी उंचावर फिरत असल्याचे एअरलाइनने म्हटले आहे. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत अशी माहिती समोर आली आहे.

शनिवारी (१६ ऑगस्ट) मुंबईत खराब हवामानामुळे कमी उंचीवर फिरण्यासाठी पॉवर अप करताना इंडिगो एअरबस ए ३२४ विमानाच्या मागच्या भागाचा स्पर्श रनवेला झाला, अशी माहिती इंडिगो एअरलाइनने दिली आहे. तेव्हा विमानाच्या वैमानिकांनी कमी उंचीवर विमान उतरवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी विमानाचा मार्ग फिरवण्याचा निर्णय घेतला.

इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, '१६ ऑगस्ट २०२५ रोजी, मुंबईत प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे इंडिगोच्या एअरबस A321 विमानाचा शेपटी म्हणजे मागील भागाचा रनवेवर स्पर्श झाला, जेव्हा ते कमी उंचीवर गो-अराउंड करत होते. त्यानंतर, विमानाने पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला आणि सुरक्षितपणे उतरले. '

'इंडिगोमध्ये मानक प्रोटोकॉलनुसार, विमानाची आवश्यक तपासणी/दुरुस्ती केली जाईल आणि नियामक मंजुरी मिळाल्यानंतरच ते पुन्हा कार्यरत होईल. इंडिगोमध्ये, आमचे ग्राहक, कर्मचारी आणि विमानांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. या घटनेमुळे आमच्या ऑपरेशन्सवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत', असे इंडिगोच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT