Mumbai Airport Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, ४० किलोचा गांजा जप्त; तिघांना बेड्या

Mumbai News: मुंबई एअरपोर्टवर महसूल गुप्तचर संचलनालयाने मोठी कारवाई करत तब्बल ४० किलोंचा गांजा जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढीत तपास केला जात आहे.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करत गांजा जप्त करण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचलनालयाने (DRI) तब्बल ३९.२ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. विशेष माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकहून मुंबईत आलेल्या दोन भारतीय प्रवाशांच्या चेक-इन बॅगेजची तपासणी केली असता ३९ पॅकेट्समध्ये हिरवट रंगाचा सुगंधी पदार्थ आढळून आला.

महसूल गुप्तचर संचलनालयाने तपासणीअंती हा पदार्थ हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही प्रवाशांच्या बॅगेजमधून प्रत्येकी १९.६ किलो असा एकूण ३९.२ किलो गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. यानंतर करण्यात आलेल्या पुढील कारवाईत गांजाचा एक स्थानिक रिसिव्हरही अटक करण्यात आला.

या प्रकरणात महसूल गुप्तचर संचलनालया एकूण तिघांना अटक केली. तिघांविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या गांज्याची बाजारात मोठी किंमत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या तिघांच्या संपर्कात आणखी कोण-कोण आहेत याचा देखील तपास केला जात आहे.

दरम्यान, ७ सप्टेंबरला मुंबई पोलिसांनी तेलंगणामध्ये ड्रग्स साम्राज्याचा अंत केला. वसई- विरार आणि मीरा -भायंदर पोलिसांनी तेलंगणातील हैदराबादमध्ये ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी तब्बल १२००० कोटी रूपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. हा या वर्षातील देशातील सर्वांत मोठा छापा असल्याचे सांगितले जाते. अँटी-नार्कोटिक्स सेल आणि क्राइम ब्रँचने या प्रकरणी आतापर्यंत १२ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वत: पोलीस मदतीला सरसावले

Bachchu Kadu: कोर्टाच्या आदेशानंतरही बच्चू कडू आंदोलनावर ठाम, म्हणाले - 'लोक उठ म्हणतील तेव्हाच उठू'| VIDEO

शेतकऱ्यांसाठी ऊस झाला गोड; प्रति क्विंटलमागे केली वाढ, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 30,000,000,000 रुपयांचा अतिरिक्त लाभ?

Private Train: भारतातील पहिली खासगी ट्रेन! राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या तुलनेत तिकीटाचे दर किती?

Satara News : सातारा डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, पीडितेच्या हात आणि पत्रावरील हस्ताक्षर जुळत नाही? ठाकरे गटाचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT