Mumbai Airport: मोठी बातमी! मुंबई विमानतळावरील नेटवर्क अचानक गंडलं; प्रवाशांचा उडाला गोंधळ

Mumbai Airport Network Crash: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात नेटवर्क बिघाड झाल्यामुळे उड्डाणांना विलंब झालाय. प्रवाशांची गैरसोय झाली असून विमान कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे इंडिगो, एअर इंडिया, अकासा आणि विस्तारा या विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.
Mumbai Airport
Mumbai Airport Network Crashsaam tv
Published On
Summary
  • मुंबई विमानतळावर नेटवर्क ठप्प झाल्याने उड्डाणांमध्ये उशीर.

  • इंडिगो, एअर इंडिया, अकासा, विस्तारा यांना मोठा फटका.

  • प्रवाशांची गैरसोय आणि विमानतळावर गर्दी वाढली.

  • तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी जलद गतीने काम सुरू.

पावसाळ्यात मुंबईच्या लोकलचे वेळापत्रक हमखास खोळंबलेले पाहायला मिळते. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहनांचे ट्रॅफिक होत असते. आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेटवर्क अचानकपणे ठप्प झाल्याची घटना घडलीय. विमानतळावरील नेटवर्क अचानक ठप्प झाल्याने येथे प्रवाशांची मोठी गैरसोय होते.

ही तांत्रिक अडचणू दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहे. दरम्यान सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक खासगी हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. मुंबईच्या विमानतळावरील सर्व्हरच डाऊन झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. नेटवर्क गायब झाल्याने विमानांचे उड्डाणही उशिराने होतंय. या तांत्रिक अडचणीमुळे इंडिगो, एयर इंडिया, अकासा, विस्तारा या विमान कंपन्यांना मोठा आर्थिक तसेच अन्य फटका बसतोय. तांत्रिक बिघाडामुळे मुंबई विमानतळावर हळू हळू प्रवाशांची गर्दी वाढतेय.

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे चेक-इन व बोर्डिंगची संपूर्ण प्रक्रिया ‘मॅन्युअल मोड’वर वळवण्यात आलीय. यामुळे प्रवाशांच्या समानाची तपासणी करण्यासाठी वेळ लागतोय. विमानतळावर अचानक नेटवर्कमध्ये समस्या येत असल्याची बाब समोर येताच. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रशासनाकडून ही अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Mumbai Airport
Mumbai Eastern Expressway: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

विमानतळाची IT आणि कोअर टीमकडून नेटवर्क दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा बिघाड नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समजलेले नाहीये. सर्व यंत्रणा सुरळीत चालू असतानाच अचानकपणे सर्व्हर ठप्प झाले. दरम्यान विमानतळावरील आयटी टीम नेमकी अडचण शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

Mumbai Airport
Thane Traffic : घोडबंदर रोड ४ दिवसांसाठी बंद राहणार, कधी आणि केव्हा? पर्यायी मार्ग कोणते?

दरम्यान एअर इंडियानं प्रवाशांना नेटवर्क खराब झाल्याची सूचना दिली होती. त्यामुळे उड्डाणे उशिराने होतील असं सांगण्यात आलं होतं. काही वेळानंतर तांत्रिक बिघाड सुधारण्यात आलाय. परंतु संपूर्ण परिस्थिती सुव्यवस्थित होण्यासाठी काही वेळ लागेल असं एअरलाइन्सकडून सांगण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com