Mumbai Crime News
Mumbai Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Airport : तस्करीसाठी आणलेले सोनं कुठे लपवलं, पाहून कस्टम अधिकारी चक्रावले, विमानतळावर तिघांना अटक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. विमानतळावर सोने तस्करी करणाऱ्या तीन विदेशी नागरिकांना अटक केली आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी तब्बल १.४० कोटी रुपये किंमतीचं सोनं त्यांच्याकडून जप्त केलं आहे.

एनआयए वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, मुंबई (Mumbai) विमानतळावर अटक केलेल्या आरोपींनी अंतर्वस्त्र आणि बुटात सोनं (Gold) लपवले होतं. या तिघांनी तब्बल १.४० कोटी किंमतीचे सोनं लपवलं होतं. कस्टम अधिकाऱ्यांनी ही कारवाई १० मार्च रोजी केली आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त रविवारी दिलं आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'तीन विदेशी नागरिक इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा येथून मुंबई विमानतळावर आले होते. कस्टम अधिकाऱ्यांनी सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांना विमानतळावरच रोखलं. या तिघांनी सोनं हे अंतर्वस्त्र आणि बुटाच्या सोलमध्ये लपवलं होतं'.

'कस्टम अधिकाऱ्यांनी सीमाशुल्क कायद्याच्या ११० कलमांतर्गत कारवाई करत तीन किलो सोने जप्त करून तिघांना अटक केली आहे. कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, असेही कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॉयलेटमधून करत होते सोने तस्करी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपूरच्या कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे चाळीस लाख किमतीचे सुमारे 700 ग्रॅम सोने (gold) जप्त केले होते. मुंबईहून नागपूर गो एअर फ्लाइटच्या केबिन टॉयलेटमधून सोने तस्करी करण्याचा प्रयत्न पथकाने हाणून पाडला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे-नारायण राणेंची निलम कंट्री येथे भेट

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

Prakash Ambedkar News | नेत्यांची भाषणं ऐकत प्रकाश आंबेडकरांनी मंचावरच डब्बा खाल्ला..

SCROLL FOR NEXT