Prakash Ambedkar News | नेत्यांची भाषणं ऐकत प्रकाश आंबेडकरांनी मंचावरच डब्बा खाल्ला..

Prakash Ambedkar News Today | देशात लोकसभेच्या निवडणुकांचा धुराळा उडालाय. नेत्यांचे पायाला भिंग्री लावून दौरे सुरू आहेत. एकाच दिवशी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात सभा घेण्यासाठी सर्वच राजकीय नेते हेलिकॉप्टरने प्रवास करताना दिसत आहेत. अशातच जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे जेवण करून पुढील सभेसाठी नेते रवाना होताना दिसतायेत.

देशात लोकसभेच्या निवडणुकांचा धुराळा उडालाय. नेत्यांचे पायाला भिंग्री लावून दौरे सुरू आहेत. एकाच दिवशी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात सभा घेण्यासाठी सर्वच राजकीय नेते हेलिकॉप्टरने प्रवास करताना दिसत आहेत. अशातच जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे जेवण करून पुढील सभेसाठी नेते रवाना होताना दिसतायेत. सभेच्या ठिकाणी गेल्यानंतर कार्यकर्त्यांबरोबर चर्चा, त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर फोटो काढणे, आणि नंतर भाषण असा व्यस्त कार्यक्रम असताना नेत्यांना जेवणासाठी वेळच मिळत नाही. असच काहीस चित्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतीतही पहायला मिळालं. प्रकाश आंबेडकर अहमदनगर येथे सभेसाठी आले होते. सकाळी हिंगोली येथे सभा घेऊन दुपारी अहमदनगर आणि त्यानंतर पुणे येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. अहमदनगर येथे सभेच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी व्यासपीठावरच आपला डबा मागवून घेऊन इतर नेत्यांच्या भाषणावेळी तो संपवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com