गिरीश कांबळे, प्रतिनिधी
राज्यभरात सध्या दिवाळीची धामधुम सुरू आहे. प्रत्येक शहरात फटाक्यांची आतषबाजी अन् धुमधडाका पाहायला मिळत आहे. फटाक्यांच्या आतषबाजीचा मोठा परिणाम शहरांतील प्रदूषणावर होताना दिसतोय. याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला असून शहरातील प्रदूषणाने उच्चांक गाठल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील (Mumbai) प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. दिवाळीच्या काळात ही प्रदूषणाची पातळी आणखीनच खालावल्याचे दिसत आहे. भाऊबिजेच्या (Bhaubij 2023) दिवशी मुंबईत ठिकठिकाणी हवेच्या गुणवत्तेची पातळी आणखीनच खालावल्याची नोंद झाली.
यामध्ये बिकेसी (BKC) आणि मालाडमध्ये (Malad) सर्वाधिक प्रदूषण असल्याचे नोंदवण्यात आले. भाऊबीजेच्या दिवशी मुंबईमध्ये रात्री बारानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याने गुरुवारी सुद्धा हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मालाडमधील एअर क्वालिटी इंडेक्स (Air Quality Index) २१५ वर पोहोचला आहे. तर बिकेसीमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स हा २४८ वर आहे. तसेच मुंबई शहर परिसरातील इतर भागांमध्येही हवेची पातळी खराब असल्याची नोंद झाली आहे.
ज्यामध्ये माझगाव १८४, कोलाबा १६०, सायन १५७, अणिक नगर १६० आणि वरळी मधील एयर क्वालिटी इंडेक्स ९९ इतका असल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनेही कंबर कसली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.