Kalyan Fire News:
Kalyan Fire News: Saam tv

Kalyan Fire News: इमारतीच्या १० व्या मजल्यावरील घराला भीषण आग, घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक

Kalyan Fire News: कल्याणच्या खडकपाडा परिसरातील एका इमारतीमधील घराला आग लागल्याची घटना घडली.
Published on

Kalyan Fire News:

सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असताना कल्याणमधून आगीचं वृत्त हाती आलं आहे. कल्याणच्या खडकपाडा परिसरातील एका इमारतीमधील घराला आग लागल्याची घटना घडली. आज बुधवारी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इमारतीमधील नेमकी आग कशी लागली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण खडकपाडा परिसरातील अमृत हेवन या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. आज बुधवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली.

आग लागल्याचे कळतात घरातील नागरिकांनी बाहेर धाव घेतली. आग इतकी भीषण होती की, घरातील खिडकीच्या बाहेर ज्वाला दिसत होत्या. या आगीची झळ बाजूच्या घराला देखील बसली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Fire News:
Eknath Shinde In Gadchiroli: तुम्ही प्राणाची बाजी लावता, म्हणून आम्ही सुरक्षित; मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घराला लागलेली आग विझविण्याचे काम सुरू केले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. आग इमारतीत इतरत्र पसरू नये म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

या आगीत जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही घरांचे मोठ्या नुकसान झालं आहे. आधीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीमुळे इमारतीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Kalyan Fire News:
Supriya Sule Bhaubij Celebration: ओवाळीते भाऊराया! गटाचा वाद विसरून सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांचं औक्षण

कोल्हापुरात दोन एकर ऊसाला आग

कोल्हापुरातही आगीची घटना घडली आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीत ऊसाला आग लागल्याची घटना घडली. अंदाजे दोन एकर ऊसाला अज्ञांतानी पेटवल्याचं सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com