Vande Bharat Saam Tv
मुंबई/पुणे

Vande Bharat: मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

Mumbai Ahmedabad Vande Bharat Express: मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता ही ट्रेन २० कोचची झाली आहे.

Siddhi Hande

मुंबई अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल

ट्रेनच्या कोचची संख्या वाढवली

आता २० डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावणार

मुंबई-अहमदाबाद प्रवास आता आणखी आरामदायी आणि सुखकर होणार आहे. मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वंदे भारत क्रमांक 22961/22962 च्या कोचची संख्या वाढवली आहे.

मुंबई-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये महत्त्वाचा बदल ( Major Changes in Vande Bharat Express)

आता मुंबई ते अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस (Mumbai Ahmedabad Vande Bharat Express) १६ डब्ब्यांवरुन २० डब्ब्यांची करण्यात आली आहे. आजपासून हा बदल झाला आहे. त्यामळे आजपासून २० डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. एकूण ४ कोच वाढवण्यात आले आहेत. याआधी तात्पुरत्या स्वरुपात कोचची संख्या वाढवण्यात आली होती. त्यानंतर आता कायमस्वरुपी ही ट्रेन २० डब्यांची करण्यात आली आहे.

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये वाढवण्यात आलेल्या ४ कोचमध्ये एसी चेअर कार, एक्झिक्युटिव्ह क्लास कोच (ECC) या डब्यांचा समावेश असणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये नेहमीच गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे कोच वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच ट्रेनचे डबे वाढवण्यात आले आहे.

मुंबई ते अहमदाबाद हा ४९१ किलोमीटरचा मार्ग आहे. हा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसमुळे फक्त ५ तास ३० मिनिटांत पूर्ण होतो.ही एक्सप्रेस बोरिवली,वापी, सुरत, वडोदरा या ठिकाणी थांबते. दोन शहरांना जोडणारी ही वंदे भारत खूपच लोकप्रिय आहे. हजारो प्रवासी या एक्सप्रेसने प्रवास करतात.

याचसोबत गांधीनगर राजधानी ते मुंबई सेंट्रल ही वंदे भारत एक्सप्रेसदेखील धावते. गांधीनगर आणि मुंबईला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप दिलासा मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT