मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन २०२७ मध्ये सुरू होण्याची शक्यता.
या मार्गावर १२ स्थानके असतील, ज्यात मुंबई, ठाणे, सुरत, अहमदाबाद यांचा समावेश.
५०८ किमी अंतर फक्त ३ तासांत पूर्ण होणार.
तिकीट दर ३,००० ते ५,००० रुपये असण्याची शक्यता.
Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. या मार्गावर १२ स्थानके असतील, त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. बुलेट ट्रेन कधी सुरू होणार, त्याची निश्चित तारीख अद्याप समोर आलेली नाही. पण २०२७ मध्ये ही ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरादरम्यान प्रवास करणं अधिक सोयीस्कर होणार आहे. (Mumbai Ahmedabad bullet train ticket price and timings)
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टला मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वेही (MAHSR) म्हटले जातेय. ही बुलेट ट्रेन जपानच्या शिंकनसन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य या बुलेट ट्रेनमुळे जोडली जाणार आहेत. 320 किलोमीटर प्रति तास वेगाने बुलेट ट्रेन या मार्गावर १२ स्थानकावर थांबेल. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास फक्त तीन तासांत पूरिण करणार आहे.
मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी सध्या सहा ते सात तास लागतात. पण या बुलेट ट्रेनमुळे हा प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होणार आहेत. गुजरातमध्ये ३४८ किमी, महाराष्ट्रात १५६ किमी आणि दादर नगर हवेली ४ किमी असा एकूण ५०८ किमीचा प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होणार असल्याचा दावा केला जात आहे.
मुंबई-अहमदाबाद या मार्गावर २०२७-२८ मध्ये बुलेट ट्रेन धावणार आहे, ही ट्रेन १२ स्थानकावर थांबणार आहे. मुंबई, ठाणे, विरार, बोहिसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद, साबरमती या स्थनकावर बुलेट ट्रेन थांबणार आहे. मुंबईतील स्थानके अंडरग्राऊंड असतील. 508 किमी मार्गावर 465 किलोमीटर लंबा रूट वायाडक्ट असेल. 9.82 किमीवर ब्रिज असतील. त्याशिवाय डोंगर चिरून भोगद्यातूनही बुलेट ट्रेन धावणार आहे. या मार्गावर बुलेट ट्रेनचे तिकिट तीन हजार ते पाच हजार इतके असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२६ मध्ये सूरत ते बिलिमोरा या दरम्यान ५० किमी अंतरावर बुलेट ट्रेनची चाचपणी सुरू होणार आहे. २०२७ मध्ये साबरमती-वापी या मार्गावर चाचपणी होईल. २०२८-२९ मध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स (बीकेसी) ते साबरमती या मार्गावर संपूर्ण ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई-अहदाबाद या बुलेट ट्रेन प्रोजेक्टच संपूर्ण खर्च १५ बिलयन डॉलर इतका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.