Mumbai Accident News Yandex
मुंबई/पुणे

Accident News: महिला पोलीस कॉन्स्टेबलचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू, नाहूर स्थानकातील घटना

Mumbai Accident News: एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना ५ मार्च रोजी नाहूर रेल्वे स्थानकावर घडली आहे.

Rohini Gudaghe

Woman Police Constable Killed In Accident

मुंबईमध्ये (Mumbai) रेल्वे स्थानकांवर अपघात होणं, हे आता नवीन नाही. रोज काही ना काही नवीन घटना घडत असतात. परंतु अशा अपघांतामध्ये मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर येत आहेत. अशीच एक घटना नाहूर रेल्वे स्थानकावर घडली आहे. ५ मार्च रोजी नाहूर रेल्वे स्थानकावर एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला लोकल ट्रेनमधून पडून जीव गमवावा लागला. अश्विनी डोमाडे ( वय 27 वर्ष) असं या महिला पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. (Latest Accident News)

५ मार्च रोजी अश्विनी डोमाडे पतीसोबत रेल्वेतून प्रवास करत होती. प्रवासादरम्यान ती रेल्वेच्या दरवाज्यात उभी राहिली. ट्रेन सुरू असताना धक्का लागल्याने अश्विनी खाली पडली. त्याच क्षणी विरुद्ध बाजूने दुसरी गाडी आली आणि तिला धडक (Mumbai Accident News) दिली. या घटनेत महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनीचा मृत्यू झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर

अश्विनीच्या पतीने रेल्वे पोलीस आणि एका पोर्टरच्या मदतीने तिला रुग्णवाहिकेतून फोर्टिस रुग्णालयात नेलं. दुपारी 2.10 वाजता अश्विनीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात (Accident News) आला. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला होता.

कुर्ला रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव म्हणाले, पोलिसांनी तिला मुलुंड येथील जवळच्या अग्रवाल रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्या पतीने अश्विनीला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्याचा आग्रह धरला होता. स्लो लोकल नाहूर स्थानकावर (Nahur Railway Station) थांबली. त्यानंतर लोकल पुन्हा सुरू झाल्यावर अश्विनी पडल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे.

पतीने वाचवण्याचा प्रयत्न केला

अश्विनीच्या पतीने तिचा हात धरून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तरीही ती घसरली. तिचं डोकं डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल ट्रेनला ( Local Train) धडकलं. तिच्या पतीने लगेच खाली उडी मारली आणि तिला प्लॅटफॉर्मवर आणलं, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अश्विनी (Woman Police Constable) ठाण्यातील पोलीस मुख्यालयात कार्यरत होती. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर अश्विनी नुकतीच जॉईन झाली होती. तिची ही पहिलीच नोकरी होती. लग्न होऊन तीन वर्षे झाली होती. ती कळवा पूर्व भागात राहत होती. तिचा नवरा एका खाजगी कंपनीत काम करत आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना काळजी घेऊन प्रवास करण्याचं आवाहन केलं आहे. प्रवास करताना नागरिकांनी सुरक्षितता बाळगणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT