Accident News: विरारमध्ये भीषण अपघात! टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नागरिकांमध्ये संताप

Youth killed In Accident: विरारमध्ये भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
Accident News
Accident NewsSaam Tv
Published On

महेंद्र वानखेडे

Tanker Accident In Virar

अनेकदा वाहतूक नियमांचा भंग केला जातो. वाहन भरधाव वेगात चालविणे, वाहन चुकीच्या बाजूने चालविणे यामुळं देखील अनेकदा अपघात (Accident News) होत आहेत. असाच एक अपघात विरारमधून समोर आला आहे. या अपघातात एका तरूणाने आपला जीव गमवला आहे. (latest accident news)

विरार पूर्वेकडील नारंगी फाटा येथे रस्त्यात उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला टँकरने पाठीमागून धडक (Tanker Accident In Virar) दिली. त्यामुळे मागच्या चाकाखाली सापडून एका ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टँकर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टँकरच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

टँकरच्या धडकेत आतापर्यंत अनेक जणांचे मृत्यू झाले आहेत, असं असताना सुद्धा आतापर्यंत भरधाव वेगाने धावणाऱ्या टँकर माफियांवर संबंधित प्रशासन कारवाई करीत (Youth killed In Accident) नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. हा अपघात सोमवारी (४ मार्च) घडला आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास विरारच्या नारंगी फाटा येथे शैलेश कोरगावकर ३२ हा रस्त्याच्या बाजूला उभा होता. इतक्यात टँकरने त्याला धडक दिली. त्यामुळे टँकरच्या मागच्या चाकाखाली आल्याने शैलेशचा जागीच मृत्यू (Tanker Accident) झाला आहे. शैलेशच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Accident News
Train Accident : त्या भयंकर रेल्वे अपघाताचं कारण आलं समोर; लोको पायलट मोबाइलवर बघत होते लाइव्ह क्रिकेट मॅच

टँकर चालकावर कारवाईची मागणी

वसई विरार महानगरपालिकेच्या (Mumbai Accident News) हद्दीत अनेक टँकर हे रस्त्यात पाणी सांडत जात असल्याने अनेकदा रस्ता निसरडा होतो. त्यामुळे अनेक अपघात होत असतात. मात्र, अशा बेजबाबदार टँकर चालकांवर कारवाई होत नसल्याने असे बळी जात असल्याचा आरोप नागरिक करत आहे.

अश्या टँकर चालकांविरोधात संबंधित प्रशासन कारवाई करणार का, असा सवाल सुद्धा उपस्थित केला जात आहे. टँकर चालकावर कारवाईची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. या अपघातानंतर या परिसरातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

Accident News
Accident: हिंगोली कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com