रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अद्यापपर्यंत उसंत घेतलेली नाही. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील ठिकठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. याचा थेट फटका वातानुकूलित लोकलला देखील बसला आहे. लोकलमधील एसी डब्यामध्ये पावसाचं पाणी गळत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वातानुकूलित लोकल डब्याचा आहे. रविवारपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा थेट फटका लोकललाही बसला. कोचमध्ये पावसाचं पाणी गळत असून, सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. यामुळे प्रवासी त्रस्त झाले असून, काहींनी संताप व्यक्त केला आहे.
'जय हो' नावाच्या एका युझरनं हा वातानुकूलित लोकल कोचचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानं व्हिडिओ शेअर करून कॅप्शन देखील दिलं आहे. 'ही मुंबईची एसी लोकल आहे. सर्व पावसाचं पाणी आत कोचमध्ये येत आहे. याचसाठी आम्ही सरकारला इतके पैसे देत आहोत का? याच प्रवासासाठी इतके पैसे आम्ही मोजतो का?'
या पोस्टवर त्यानं रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मध्य आणि पश्चिम रेल्वेसह प्रमुख अधिकाऱ्यांना टॅग केले आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.