sanjay dina patil news  Saam tv
मुंबई/पुणे

मुलुंडमधील डम्पिंग ग्राउंडवर गोल्फ क्लब नव्हे, गरिबांसाठी रुग्णालय, शाळा बांधा; ठाकरेंच्या खासदाराची मागणी

sanjay dina patil news : मुलुंडमधील डम्पिंग ग्राउंडवर गोल्फ क्लब बांधण्याचा पालिकेचा विचार आहे. मात्र, या जागेवर गरिबांसाठी रुग्णालय, शाळा बांधण्याची मागणी ठाकरेंच्या खासदारांनी केली आहे .

Vishal Gangurde

मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर गोल्फ क्लब उभारण्याचा मनपाचा निर्णय

भाजप आमदार मिहीर कोटेचा यांची गोल्फ क्लब उभारण्याची मागणी

मात्र खासदार संजय दिना पाटील यांनी रुग्णालय, शाळा, महाविद्यालय बांधण्याची मागणी

मयूर राणे, साम टीव्ही

मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर गोल्फ क्लब बनविण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे. त्याबाबत लवकरच कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलं आहे. मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर गोल्फ क्लब बनवण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केली होती. मात्र ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. गोल्फ क्लबऐवजी या ठिकाणी क्रीडा संकुल, महाविद्यालय, सर्व सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय बांधण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंडवर लाखो टन कचरा अद्यापही पडलेला असून त्याला उचलण्याचे काम चालू आहे. त्यानंतर या जागेवर गोल्फ क्लब बनविण्यात यावे, अशी मागणी भाजपा आमदार मिहीर कोटेच्या यांनी केली होती. त्यानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून डम्पिंग ग्राउंड च्या जागेवर गोल्फ क्लब बनवण्याबाबत लवकरच प्रक्रिया सुरू केली जाईल, असे पालिका आयुक्त भूषण गगरांनी यांनी सांगितले.

तत्पूर्वी, ईशान्य मुंबईमध्ये रुग्णालयाची अवस्था पाहता या ठिकाणी सर्व सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय या डंपिंग ग्राउंडवर व्हावे तसेच शाळा, महाविद्यालय, क्रीडा संकुल बनविण्यात यावे अशी मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी केली होती.

मात्र या ठिकाणी गोल्फ क्लब बनवण्याचा निर्णय घेतल्याने हा खेळ अति श्रीमंत लोकांचा असल्याने त्याचा सर्वसामान्य लोकांना काय फायदा होईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे स्थानिक लोकांनीही या निर्णयाला विरोध केला असून या ठिकाणी गोल्फ क्लब ऐवजी रुग्णालय, शाळा, कॉलेज बांधण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! सासरच्या भांडणाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; विहिरीत उडी मारली अन्...

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेसाठी रवींद्र धंगेकर त्यांच्या चिरंजीवाला मैदानात उतरवणार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹३००० येणार, महत्वाची अपडेट समोर

IND vs SA : प्रिन्स आता तरी चमकणार? दक्षिण आफ्रिकेविरोधात ११ शिलेदार कोणते?

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा राग अनावर, 'तो' फोटो शेअर करत म्हणाली- "असले उद्योग थांबवा..."

SCROLL FOR NEXT