Pune Crime गोपाळ मोटघरे
मुंबई/पुणे

पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नची झलक, कोयत्याने कापला केक

पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नची झलक पहायला मिळाली

गोपाळ मोटघरे

पुणे: पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नची झलक पहायला मिळाली आहे. मुंढवा परीसरात भर रस्त्यात गाड्या उभ्या करून, हातात कोयते नाचवत गाव गुंड स्वतःचा वाढदिवस (Birthday) साजरा करत स्थानिक नागरिकात दहशत निर्माण करत आहेत. वाढदिवसाचा केक कोयत्याने कापत दहशत (Panic) पसरवणाऱ्या ४ गाव गुंड मुलांना मुंढवा पोलिसांनी (police) अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले गाव गुंड मुलं साधारण १८ ते २१ वर्ष वयोगटातील आहेत.

हे देखील पहा-

वीरेंद्र बाजीराव सस्ते, शशांक श्रीकांत नानागवेकर, समीर विश्वजीत खंडाळे, सुखविंदरसिंग पप्पुसिंग टाक अशी अटक (Arrested) करण्यात आलेल्या गाव गुंड मुलाची नावे आहेत. एकेकाळी शांत असलेल्या पुण्यात (pune ) अनेक टोळ्या कार्यरत झाल्या आणि शहराचे स्वरूप बदलत चाले आहे. रिअल इस्टेटच्या पार्श्वभूमीवर असलेल्या गुन्हेगारीचे चित्रण आपल्याला 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात पाहायला मिळालं, पण पुण्यात या टोळ्या कुठून आल्या या प्रश्नाची देखील चर्चा होताना दिसत आहे.

"आयटी क्षेत्राच्या उदयानंतर पुण्याचा चेहरा- मोहरा बदलू लागला. पुण्याच्या आजूबाजूच्या गावातल्या जमिनीला भाव येऊ लागले. त्यातून जमीन मोकळी करून देणारे आणि व्यवहार पूर्ण करून देणाऱ्या एजंटची संख्या वाढू लागली. जमिनीच्या व्यवहारासाठी लाखो रुपये मोजले जाऊ लागले. कार्पोरेट कंपन्यांना एकगठ्ठा जमीन मिळवून देणाऱ्या एजंटची गरज पडू लागली. कधी- कधी जमीन मोकळी करून घेण्यासाठी मसल पॉवरचा उपयोगही करावा लागत असे. त्यातून गुंडगिरीला चालना मिळाली.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT