Darshana Pawar Rahul Handore Case Updates Saam TV
मुंबई/पुणे

Darshana Pawar Death Case : मोबाईल बंद, विविध राज्यात भटकंती... दर्शना पवारचा मारेकरी पोलिसांच्या सापळ्यात कसा अडकला?

Pune Crime News : दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल हांडोरे जवळपास दहा दिवस गायब होता.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : एमपीएससी (MPSC)  परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या आणि सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दर्शना पवारची तिची मित्र राहुल हांडोरे निघृण हत्या केली. आरोपी राहुलला पोलिसांना काल मुंबईतून अटक केली. एकतर्फी प्रेमातून ही हत्या केल्याची कबुली राहुलने दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

दर्शना पवारची हत्या केल्यानंतर राहुल हांडोरे जवळपास दहा दिवस गायब होता. पोलिसाच्या हाती लागू नये म्हणून राहुल अनेक राज्यांमध्ये फिरत होता. मात्र त्याची गरज आणि एका चुकीमुळे तो पोलिसांच्या हाती लागला.

दर्शनाची 12 जून रोजी हत्या झाली. त्यानंतर 16 जून रोजी तिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी सापडला होता. त्यानंतर पोलिसांना तपास सुरु केला तेव्हा राजगडावर दर्शनासोबत असलेल्या राहुल हांडोरेचं नाव पुढे आहे. मात्र राहुलच्या कुटुंबियांनीही राहुल हरवल्याची तक्रार दिल्याने पोलिसांसमोरील आणखी पेच आणखी वाढला.

मात्र राजगडाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये राहुल राजगडावरून एकटाच आल्याचं दिसल्याने पोलिसांचा संशय त्याच्यावर बळावला होता. त्यानंतर पोलिसांनी राहुलचा मोबाईल ट्रॅक करायला सुरुवात केला.

मोबाईल बंद ठेवत असल्याने अडचण

मात्र राहुल पोलिसांच्या हाती लागून नये म्हणून सतत आपल्या मोबाईलचं सिमकार्ड बदलत होता. दर्शनाच्या हत्येनंतर राहुलचं मोबाईल लोकेशन आधी कात्रज, त्यानंतर कोलकाता, दिल्ली असं विविध राज्यांमध्ये दाखवत होतं. मात्र राहुल मोबाईल सतत बंद ठेवत असल्याने त्याचं लोकेशन ट्रेस करणे पोलिसांना शक्य होत नव्हतं.

नातेवाईकांची घेतली मदत

दरम्यान राहुल आपल्या काही नातवाईकांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. राहुलकडील पैसे संपल्याने तो नातेवाईकांकडे पैसे मागत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने राहुलपर्यंत पोहोचण्या प्रयत्न सुरु केला.

नातेवाईकांना राहुलला पैशांची विचारणा करण्यास सांगितलं. नातेवाईकांना पाठवलेल्या मेसेजला राहुलकडूनही उत्तर मिळाला. राहुलला पैसे मिळाल्यानंतर तो ज्या एटीएममधून पैसे काढेल तिथून त्याच्या लोकेशनची माहिती पोलिसांना मिळत होती. अखेर राहुल हंडोरे याला मुंबईवरुन पुण्याकडे जात असताना पोलिसांनी अटक केली.  (Pune News)

आरोपीला पोलीस कोठडी

गुरूवारी पुणे पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरे याला मुंबईतून अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने राहुल हंडोरे याला २९ जूनपर्यंत म्हणजेच ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता आरोपी राहुलने दर्शनाची हत्या का? आणि कशी केली? याचं लवकरच गुढ उलगडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT