सागर आव्हाड साम टीव्ही, पुणे
लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) घेतला आहे. यावर आता विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीसाठी मुदत वाढ मिळावी, अशी मागणी काही विद्यार्थिनींनी केली आहे तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की परीक्षा आत्ताच घेण्यात (MPSC Students Reaction) यावी. (Latest Marathi News)
त्यामुळे उपनिरीक्षक पदाच्या चाचणीसाठी विद्यार्थ्यांचे दोन गट पडलेले दिसतात. या दोन्ही गटाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा- २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी (PSI Physical Test) १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे ही चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतला आहे. राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ वेळी कायदा (MPSC Students On PSI Physical Test) आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक आहे.
त्यामुळे चाचणीसाठी पोलीस अधिकारी, तसेच इतर मनुष्यबळ पुरवणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी एमपीएससीला कळवले आहे. या पार्श्वभूमीवर नियोजित शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात (MPSC Exam) आला. दोन गट निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत पाहायला मिळत आहेत.
लोकसभा निवडणूकीमुळे आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या यावर संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. शारीरिक चाचणी १५ एप्रिल ते २ मे या दरम्यान होणार (Pune News) होती. आता मात्र, ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.