MPSC News: पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता नवीन नियमावली जारी, शारीरिक चाचणीसाठी ही असतील मानके

Police News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरिता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित करण्यात आली आहेत.
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता नवीन नियमावली जारी, शारीरिक चाचणीसाठी ही असतील मानके
Police NewsSaam Digital

>> हिरा ढाकणे

MPSC News:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरिता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित करण्यात आली आहेत.

‘स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता’ आणि ‘स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता’ शारीरिक चाचणीची मानके व गुण आयोगामार्फत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता नवीन नियमावली जारी, शारीरिक चाचणीसाठी ही असतील मानके
Akola News: पोलिस अधिकारीच लाचेची रक्कम घेऊन पळाला, अकोल्यातील धक्कादायक घटना

शारीरिक चाचणीचा तपशील

स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता

१) गोळा फेक- वजन- ७.२६० कि.ग्रॅ. कमाल गुण-१५

२) पुलअप्स- कमाल गुण-२०

३) लांब उडी- कमाल गुण-१५

४) धावणे (८०० मीटर)- कमाल गुण-५०  (Latest Marathi News)

स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता

१) गोळा फेक- वजन- ४ कि.ग्रॅ.- कमाल गुण-२०

२) धावणे (४०० मीटर) – कमाल गुण-५०

३) लांब उडी- कमाल गुण-३०

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता नवीन नियमावली जारी, शारीरिक चाचणीसाठी ही असतील मानके
Amravati News: अमरावतीकरांसाठी खुशखबर! मतदानादिवशी जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

सन-२०२२ च्या परीक्षेकरिताः शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे ६० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.

सन-२०२३ च्या परीक्षेकरिताः शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ७० टक्के गुण (म्हणजे ७० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.

तृतीयपंथी उमेदवारास त्यांची पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी अशी स्वतःची लिंग ओळख निश्चित करणे आवश्यक राहील व यासंदर्भात विहित सक्षम प्राधिका-याने दिलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र शारीरिक चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. सदर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com