Amravati News: अमरावतीकरांसाठी खुशखबर! मतदानादिवशी जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Lok Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमानुसार अमरावती लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे.
Amravati News
Amravati NewsSaam Tv

Amravati News:

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमानुसार अमरावती लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 26 एप्रिल 2024 या मतदानाच्या दिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, कंपन्या व संस्थाना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. यात अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास अशा व्यवस्थापनाने कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कमीत कमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी आस्थापना किंवा कारखाना मालकाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati News
Maharashtra Politics: येत्या ८ दिवसात अनेक मोठ्या घडामोडी घडतील, शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; ठाकरे गटाचं वाढणार टेन्शन?

कायदा सुव्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करा: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव

दरम्यान, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.  (Latest Marathi News)

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहिता व कायदा सुव्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना व दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यादव यांनी संबंधित विभागांना दिले. निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा दैनंदिन अहवाल अद्ययावत ठेवून तो दररोज पाठविण्याबाबत पोलीस उपायुक्त यांनी दक्षता घेण्याच्या सूचनाही यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

Amravati News
Eknath Khadse: 'होय, मी भाजपात जाणार', एकनाथ खडसेंची होणार भाजपमध्ये घरवापसी

मुंबई शहर जिल्ह्याच्या बहुतांश सीमा या सागराशी संलग्न असल्यामुळे सागरी सीमा सुरक्षेशी संबंधित कोस्ट गार्ड मेरीटाइम बोर्ड आणि मुंबई पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश यादव यांनी संबंधितांना दिले. अवैध मद्य वाहतुकीवर नियंत्रण व त्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com