Pune: मागील ३६ तासांपासून पुण्यात एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे.
यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. शरद पवारांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी फोनवरून तीन मिनिटं चर्चा केली.या चर्चेत मुख्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल, ज्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण स्थगित केलं आहे मात्र आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे. (Sharad Pawar)
या भेटीत शरद पवार यांनी शरद पवारांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये एमपीएससीचे ५ विद्यार्थ्यांशी समिती आणि शरद पवार यांच्या सोबत येत्या दोन दिवसात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याच आश्वसन दिले गेले आहे.
ही घोषणा पवारांनी करताच विद्यार्थ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून तसेच मोबाईलची टॉर्च लावून याचे स्वागत केले. शरद पवार यांच्या या आश्वासनानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांनी उपोषण स्थगित केले आहे मात्र आंदोलन सुरूच राहणार ठेवणार विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित करताना पवार म्हणाले की, "माझ्याकडे हा प्रश्न आधीच आला आहे. मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, विद्यार्थी प्रतिनिधी, मी स्वत:, विद्यापीठाचे कुलगुरू, एमपीएससीचे पदाधिकारी आणि आपण बैठक घेऊ," यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आंदोलनस्थळावरून फोनवर संवाद साधला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन दिवसांत बैठक घेण्यास तयार असल्याचं म्हटले आहे. (Pune News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.