MPSC  Saam Tv
मुंबई/पुणे

MPSCची मोठी कारवाई; 3 दिव्यांग उमेदवारांना एमपीएससीने वगळले, कारण काय? पाहा व्हिडिओ

Pune News : MPSCने मोठी कारवाई केली आहे. एमपीएससीने ३ दिव्यांग उमेदवारांना वगळले आहे.

Saam Tv

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे : एमएससीतून मोठी बातमी हाती आली आहे. दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे पात्र ठरलेल्या तीन उमेदवारांना एमपीएससीने वगळले आहे. एमपीएससीच्या 2022 च्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या नऊ दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर केलेल्या तपासणीत तीन उमेदवार अपात्र ठरले. त्यानंतर एमपीएससीची मोठी कारवाई केली आहे.

दिव्यांग उमेदवार ठरले अपात्र

राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत काही पात्र दिव्यांग उमेदवारांच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर या दिव्यांग उमेदवाराच्या प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्याची मागणी मॅटमध्ये करण्यात आली होती. मॅटने उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र पुन्हा तपासण्यात यावेत, असे आदेश दिले होते. त्यानंतर या नऊ उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्यात आली. त्यात तीन उमेदवार अपात्र ठरले आहेत.

एमपीएससीच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीतून या तीन उमेदवारांची नावे वगळण्यात आली आहेत. उपजिल्हाअधिकारी तहसीलदारपदी या तिघांची झाली असती. दिव्यांग प्रमाणपत्र त्रुटी आढळणे आढळल्याने वगळण्यात आलेल्या या उमेदवारांवर एमपीएससी पुढील कारवाई करणार का, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलं आहे.

MPSC परीक्षेत कृषी विभागात समावेश

एमपीएससी परीक्षेत कृषी विभागाचा समावेश करण्यात आलाय. कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करण्यात आलाय. 58 कृषी अधिकाऱ्यांच्या जागा एमपीएससीत देण्यात आल्यात. त्यातील 48 जागा या कृषी उपसंचालकपदासाठी आहेत.

एमपीएससी करण्याऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर तीन दिवस आंदोनल केले होते. याच आंदोलनाची दखल घेऊन कृषी विभागाच्या जागांचा राज्यसेवेच्या होणाऱ्या परीक्षामध्ये समावेश करण्यात आलंय. कृषी विभागाच्या जागांचा समावेश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

SCROLL FOR NEXT