MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; आता परीक्षेत कृषी विभागाचा समावेश, किती जागांचा झाला समावेश? पाहा व्हिडिओ

agriculture department Jobs : MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी बातमी हाती आली आहे. एमपीएसीत कृषी विभागाचा समावेश झाल्याने विद्यार्थांना मोठा लाभ होणार आहे. वाचा सविस्तर
MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; आता परीक्षेत कृषी विभागाचा समावेश, किती जागांचा झाला समावेश? पाहा व्हिडिओ
MPSCSaam tv
Published On

मुंबई : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. एमपीएससी परीक्षेत आता कृषी विभागाचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. शासनाने हा निर्णय घेण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं.

एमपीएससी परीक्षेत कृषी विभागाचा सामावेश झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश झाला आहे. तर ५८ कृषी अधिकाऱ्यांच्या जागा एमपीएससीत देण्यात आल्या आहेत. त्यातील ४८ जागा या कृषी उपसंचालक पदासाठी देण्यास आल्या आहेत. तर या निर्णयासाठी एमपीएससी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीन दिवस आंदोलन केले होते.

MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; आता परीक्षेत कृषी विभागाचा समावेश, किती जागांचा झाला समावेश? पाहा व्हिडिओ
MPSC Student protest : एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन; आंदोलकांची पोलिसांसोबत बाचाबाची, पाहा VIDEO

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल घेऊन कृषी विभागाच्या जागांचा राज्यसेवेच्या होणाऱ्या परीक्षामध्ये समावेश करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या जागांचा समावेश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयानंतर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचा अध्यक्ष महेश घरबुडेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'एमपीएससी करण्याऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर सलग ३ दिवस आंदोनल केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन कृषी विभागाच्या जागांचा राज्यसेवेच्या होणाऱ्या परीक्षामध्ये समावेश करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या जागांचा समावेश झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. हा विद्यार्थी एकजुटीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया महेश घरबुडेने दिली आहे.

MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; आता परीक्षेत कृषी विभागाचा समावेश, किती जागांचा झाला समावेश? पाहा व्हिडिओ
PSI Bharti: मोठी बातमी! ६१४ पीएसआयच्या जागांसाठी भरती निघाली, MPSC कडून जाहिरात, जाणून घ्या अटी-शर्ती

एमपीएसीत कृषी विभागाच्या किती जागांचा समावेश झालाय?

कृषी उपसंचालक - 48 पदे

तालुका कृषी अधिकारी - 53 पदे

कृषी अधिकारी - 157 पदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com