परिवहन विभागातील नियुक्त्यांचा धक्कादायक प्रकार समोर  सागर आव्हाड
मुंबई/पुणे

MPSC: पुढील परीक्षांच्या तारखा ठीक मात्र नियुक्त्यांचं काय? विद्यार्थ्यांचा सरकारला सवाल

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे - महाराष्ट्र Maharashtra राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) MPSC वतीने सप्टेंबर २०१९ मध्ये सहायक मोटर वाहन निरीक्षक पदाचा निकाल Result जाहिर करण्यात आला. यामध्ये ८३२ जागांसाठी नावे घोषित करण्यात आली. मात्र एक वर्ष उलटून गेल्यानंतरही यापैकी ४७ जागांची नियुक्ती प्रक्रिया होऊ शकली नाही. धक्कादायक बाब म्हणजे सरकार पुढील काळात होणाऱ्या परीक्षांची चाचपणी करीत असताना यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्यांबाबत मात्र बोलायला तयार नाही.

स्पर्धा परीक्षेचा उमेदवार स्वप्नील लोणकर आत्महत्या Swapnil Lonkar Suicide प्रकरणानंतर राज्य सरकार सह सर्वच अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रिया जलद गतीने करू असे आश्वासन दिले होते. राज्यभरात व्यक्त करण्यात आलेल्या आक्रोशानंतरही सहायक मोटर वाहन निरीक्षक पदाच्या ४७ नियुक्त्या लॉकडाऊन Lockdown आणि अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे प्रलंबीत राहिल्या आहेत.

हे देखील पहा -

या नियुक्त्यांसाठी मुदत वाढ न मिळाल्यास या ४७ जागांचे आणि उमेदवारांचे भवितव्य अनिर्णित राहणार आहे. यासंबंधी परिवहन विभागाने एमपीएससीला मुदतवाढ संदर्भात पत्र पाठविले होते. याचे उत्तर देताना उप सचिव संजय देशमुख पत्रकात म्हणतात, ‘‘सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजीच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार आयोगास प्रतीक्षा यादीचा कालावधीस मुदतवाढ मान्य करता येत नाही.’’    

प्रतिक्षा यादीतील उमेदवार म्हणाले,‘‘कोरोनाच्या साथीमुळे नियुक्त्या रखडल्याचे आम्हाला सांगण्यात आले. खर तर प्रलंबित नियुक्त्यांसाठी परिवहन विभागाने मुदतवाढीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला पाठविणे आवश्यक आहे. शासनाने याची दखल घेत आम्हाला न्याय मिळवून द्यावा. लॉकडाऊनमध्ये  सरकारी कार्यालये बंद होती. तरीसुद्धा एमपीएससी नियमांवर बोट ठेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी का खेळत आहे

निर्णय सामान्य प्रशासनाच्या हाती  सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने ऑगस्ट २०१९ मध्ये प्रतीक्षायादी संदर्भात शासन निर्णय काढण्यात आला. त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जर एमपीएससीने निर्धारित केलेल्या वेळेत प्रतीक्षा यादीसाठी नावे मागविण्यास मर्यादा आल्या. तर त्यांना मुदतवाढ देण्याची तरतूद परिपत्रकामध्ये नाही. यासाठी जर सामान्य प्रशासन विभागाने सुधारित अध्यादेशात नैसर्गिक आपत्तीचा उल्लेख केला, तरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची नियुक्ती होऊ शकते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT