अतिवृष्टीत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर

यवतमाळ जिल्ह्यावर संकट कोसळले असताना पालकत्व कुठेय? 
अतिवृष्टीत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर
अतिवृष्टीत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावरसंजय राठोड
Published On

संजय राठोड

यवतमाळ -  सध्या यवतमाळ Yavatmal जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी Farmer वर्ग चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यात मंगळवारी उमरखेड ते पुसद Pusad मार्गावरील दहागाव नजीक नाल्यात पुराच्या पाण्यात बस वाहून गेली त्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर एक एसटी चालक अजूनही बेपत्ता आहे. अशा प्रस्थितीत जर जिल्ह्याचे पालकमंत्री गायब राहत असेल तर नागरिकांनी आपल्या समस्या कोणाकडे घेऊन जायचं अशा सवाल या निमित्ताने उपस्थितीत होत आहे.

हे देखील पहा -

पण जिल्ह्यातील मंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आल्याने पालकमंत्र्यांचे यवतमाळ जिल्ह्याकडे स्पेशल दुर्लक्ष होत आहे. पंधरा दिवसा आधी एका कार्यक्रमाला भेट देऊन काही बैठका घेतल्या तेव्हा पासून पालकमंत्री संदिपान भुमरे गायब आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणुन देशात ओळखला जातो. याआधी संजय राठोड हे  जनता दरबार घेऊन शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे. पालकमंत्री असताना देखील त्यांनी ही जबाबदारी योग्य रित्या पार पाडली. पण पालकमंत्री यांच्याकडे जिल्हाचे पालकत्व देण्यात आल्याने जिल्ह्यातील नागरिक पालकत्व पासून वंचित आहे. 

अतिवृष्टीत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर
बीड जिल्ह्यात अद्याप जनजीवन विस्कळीत, पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला

पालकमंत्रीच जर जिल्ह्यात येत नसेल तर त्या जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या समस्या सोडवणार तरी कोण? पालकमंत्री पैठण येथील आहेत. दहा ते पंधरा दिवसातून एकाद्या वेळी जिल्ह्याच्या ठिकाणी येतात आणि बैठक घेऊन पुन्हा मुंबई कडे रवाना होतात. त्यामुळे पालकमंत्र्यांची प्रशासनावर वचक नाही. जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर ही पालमंत्र्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील नेत्यांकडे पालकत्व देण्याची मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com