बीड जिल्ह्यात अद्याप जनजीवन विस्कळीत, पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला

बिंदुसरा धरणाच्या चादरी वरून पडणाऱ्या पाण्यानं घेतलं रौद्र रूप
बीड जिल्ह्यात अद्याप जनजीवन विस्कळीत, पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला
बीड जिल्ह्यात अद्याप जनजीवन विस्कळीत, पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाविनोद जिरे
Published On

बीड - जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसाने, जिल्ह्यातील सर्वच लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील मांजरा आणि माजलगाव धरणाचे दरवाजे उघडले आहेत. तर जिल्ह्यातील मांजरा, सिंदफणा, गोदावरी वाण, सरस्वती, बोभाटी, कुंडलिका, बिंदुसरा नद्यांसह अनेक नद्यांना, गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात तुफान पूर आला होता. यामुळं आपेगाव, देवळा, पारगाव शिमरी, रेवकी, राजापूर, यांसह अनेक गाव पाण्यात गेली होती.

हे देखील पहा -

दरम्यान आज अनेक भागातील पुराचं पाणी कमी होत आहे. मात्र जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे. गावखेड्यातील नदीवरील पूलं वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. विद्युत डीपी, पोल, तारांची पडझड झाल्यानं अंबाजोगाई तालुक्यातील अपेगाव, देवळा गावांसह अनेक गावांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून लाईट नाही. त्यामुळं स्वच्छ पाणी,आटा, मोबाईल चार्जिंग यासह अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. शेतात राहणाऱ्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

बीड जिल्ह्यात अद्याप जनजीवन विस्कळीत, पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला
विद्यार्थ्याचा अजब प्रताप,शिक्षिकांचे अश्लील फोटो काढून केले व्हायरल

तर केज - अंबाजोगाई महामार्गावरील पूल काल वाहून गेला असून अद्याप हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. तर दुसरीकडे बिंदुसरा धरणाच्या चादरीवरून वाहणाऱ्या पाण्याने रौद्ररूप धारण केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com