Supriya Sule Mobile Hacked Saam Tv
मुंबई/पुणे

Supriya Sule Mobile Hacked: खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक, तक्रारीनंतर मोबाईल पुन्हा सुरू; काय आहे प्रकरण?

Supriya Sule News: खासदार सुप्रिया सुळेंचा हॅक झालेला मोबाईल अखेर सुरू झालाय. आज सकाळी त्यांचा मोबाईल हॅक झाला होता. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. आपल्याला कुणी मेसेज किंवा फोन करून नका असं आवाहनही सुप्रिया सुळेंनी केलंय होतं.

Girish Nikam

राज्याच्या राजकारणात सध्या मोठा राजकीय संघर्ष सुरु आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महायुती आणि मविआचे नेते आता विधानसभेसाठी सज्ज झाले आहेत. रविवारी एका घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दौंड येथील पाटसमध्ये शिवस्वराज्य यात्रेनिमित्त खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या.

यावेळी त्यांनी मोबाईल हॅक झाल्याची माहिती भर सभेतच दिली. त्याचवेळी राजकारणाची पातळी घसरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. फोन बंद असताना, सिम काढलेले असतानाही माझ्या फोनवरून कुणीतरी दुसराच मेसेज करत होता अशी माहिती सुळेंनी दिली. ट्वीट करत त्यांनी कोणीही मेसेज किंवा फोन करू नये, असं आवाहन केलं.

सुप्रिया सुळे यांचा जनसंपर्क मोठा आहे. शिवाय त्या सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असतात. कार्यकर्त्यांचे मोबाईलवर येणारे फोन आणि मेसेजलाही त्या आवर्जून रिप्लाय करत असतात. मात्र त्यांचा फोन आणि वॉट्सअप हॅक झाल्यानं खळबळ उडाली आहे. मात्र यावरुन राजकारण करु नये, असं खासदार सुनील तटकरेंनी म्हटलंय.

पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर काही वेळाने सुप्रिया सुळेंचा मोबाईल व्यवस्थीत सुरु झाला. मात्र डिजिटल सुरक्षेविषयी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलंय. माझा पक्ष नेला, चिन्ह नेलं, अजून काय काय नेतील.. याची गॅरंटी नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर प्रहार केलाय.

सध्याच्या राजकीय संघर्षात राष्ट्रीय नेत्याचा मोबाईल हॅक होणं ही निश्चितच गंभीर बाब आहे. आता हा मोबाईल कुणी हॅक केला याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

Aadhar Card : खुशखबर! आता आधार अ‍ॅपवर क्षणात नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार

Dahi Kachori Recipe: नाश्त्याला बनवा खुसखुशीत दही कचोरी; १० मिनिटांत बनेल अशी रेसिपी

SCROLL FOR NEXT