Supriya Sule angry over Deenanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise death case Saam Tv News
मुंबई/पुणे

Supriya Sule : ती कुणाची आई, बहीण अन् बायको होती...; हॉस्पिटलला माणुसकी आहे की नाही? सुप्रिया सुळे संतापल्या

Supriya Sule on Deenanath Mangeshkar Hospital : 'या जगात सर्वात उत्तम डॉक्टर भारतात आहेत. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, एक डॉक्टर वाईट वागला म्हणून सर्वच डॉक्टर वाईट होत नाही. जगामध्ये भारताकडे अभिमानाने बघितलं जातं'.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी शहरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी शासकीय समितीच्या आधारे रूग्णालयाची चौकशी करण्यात येत आहे. यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. 'या जगात सर्वात उत्तम डॉक्टर भारतात आहेत. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, एक डॉक्टर वाईट वागला म्हणून सर्वच डॉक्टर वाईट होत नाही. जगामध्ये भारताकडे अभिमानाने बघितलं जातं', सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

'भारताल लोकं खूप विश्वासाच्या नात्याने येतात, आणि आपल्याकडे डॉक्टरांना देव मानतात. आपण सगळ्यांनी कोरोना काळात अनुभवलं आहे. त्यामुळे एका हॉस्पिटलमुळे किंवा एका डॉक्टरमुळे सर्वच वाईट नसतात, पण या प्रकरणात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच जबाबादर आहे आणि त्यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल. शरद पवार मुख्यमंत्री आणि श्रीनिवास पाटील कलेक्टर असताना ही जागा देण्यात आली. त्या काळात लता दीदींनी मोठा हस्तक्षेप केला होता, आणि तेव्हा ही जमीन देण्यात आली होती, आणि हे हॉस्पिटल उभं राहीलं, हा त्याचा इतिहास आहे. त्यानंतर नागरिक हॉस्पिटलमध्ये जात होते, त्याकाळातही अधूनमधून तक्रारी येत होत्या. शेवटी हॉस्पिटल असल्यामुळे सगळ्यांनी तेव्हा मदतीची भुमिका बजावली. पण दुर्दैव आहे की, एवढं मोठं नाव आहे त्या हॉस्पिटलला आणि त्याच्यात मंगेशकर कुटुंबाची काही चुक नाहीय, कारण ते त्या हॉस्पिटलच्या प्रशासनात नाहीय, फक्त ते ट्रस्टी आहेत. त्यामुळे आपण त्यांनाही विनंती करु की, दीनानाथ मंगेशकरांचं नाव दिलेल्या हॉस्पिटलमध्ये अशी घटना होतेय, हे अतिशय धक्कादायक आहे. मंगेशकर कुटुंबाचं या देशात एवढं मोठं योगदान आहे', असंही त्या यावेळी म्हणाल्या.

'कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांना प्रश्न केला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या गोष्टी बाहेर बोलण्याची गरजंच नव्हती. इतकं असंवेदनशील हॉस्पिटल म्हणजे हे धक्कादायक गोष्ट आहे. त्यांनी कितीही माफी मागितली तरी ते कमीच आहे. त्या बाळांची आई, कुणाची बायको, कुणाची बहीण होती ती, हॉस्पिटलमध्ये काही माणुसकी राहिली की नाही', असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

SCROLL FOR NEXT