Sanjay Raut On Baba Ramdev Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut: अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? सणसणीत कानाखाली वाजवायला हवी होती; बाबा रामदेव प्रकरणी संजय राऊत भडकले

Sanjay Raut Slams Baba Ramdev: या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीय का हे मला पाहायचं आहे असा टोलाही संजय राऊतांनी सरकारला लगावला आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Sanjay Raut On Baba Ramdev: योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. ज्यावेळी बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं तेव्हा त्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या. पण, त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमृता फडणवीसांना कोपरखळी मारली आहे. बाबा रामदेव (Baba Ramdev) महिलांबाबत असं बोलत असताना आमच्या अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? असा सवाल उपस्थित करत, त्यांनी सणसणीत कानाखाली वाजवायला हवी होती असं संजय राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut Latest News)

बाबा रामदेव यांच्यावर टीका करताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, हे लज्जास्पद विधान केलं असताना उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी तिथे बसलेल्या होत्या. असं असताना आमच्या अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? असं विधान करणारा कोणीही आणि कितीही मोठा असो त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला हवी होती असं राऊत म्हणाले.

तसेच एका बाजूला तुम्ही महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतात, ज्ञान पाजळतात. त्याचवेळेला एक बाब, भगवे वस्त्र परिधान करणारा महिलांचा अपमान करतो. राज्यपाल शिवाजी महाराजांचा अपमान करतात, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर,सांगली खेचून घेण्याची भाषा करतात आणि हे सरकार शांत बसतं. या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीय का हे मला पाहायचं आहे असा टोलाही त्यांना सरकारला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले होते बाबा रामदेव?

ठाण्यातील योगा कार्यक्रमात बाबा रामदेव बोलत होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raw Vs Roasted Pumpkin Seeds: कच्चा की भाजलेल्या, कोणत्या भोपळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर

महापालिकांचे आयुक्त बदलले! IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानच्या २४व्या हप्त्याचे २,००० कधी जमा होणार?

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे गटावर निलेश राणेंची टीका; दोन ठाकरे एकत्र आले तरी राजकीय फरक पडणार नाही

Health Tips : एकाच वेळी अतिप्रमाणात पाणी प्यायलं तर शरीरात नक्की काय घडतं? आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

SCROLL FOR NEXT