Arti Mhalaskar News: मुलीच्या शिक्षणासाठी आईन विकलं मंगळसूत्र; जिद्दीने शिकलेली आरती बनली PSI

PSI Arti Mhalaskar News: आरती म्हाळसकर यांची महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
PSI Arti Mhalaskar
PSI Arti Mhalaskarदिलीप कांबळे
Published On

Maval Latest News : मनात जिद्द असेल तर सर्वकाही शक्य आहे असं म्हटलं जातं. याचं ताजं पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये (Maval) पाहायला मिळालं आहे. मावळमधील आरती म्हाळसकर या महिलेनं अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतलं आणि राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे वडगाव मावळातील पंचक्रोशीत त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. (Pune Latest News)

PSI Arti Mhalaskar
How Hackers Hack Phone: तुमचा फोन हॅक झालाय का? 'ही' आहेत मोबाईल हॅकिंगची लक्षणे, जाणून घ्या उपाय

आरती म्हाळसकर या मूळच्या कोकणातल्या. त्यांच्या घरची परिस्थितीही बेताची होती. हातावर पोट असलेल्या आईने आरती यांना मोठ्या कष्टाने दहावीपर्यंत शिकवलं. पुढील शिक्षण घेत असताना आरती यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. मात्र शिक्षणाची जिद्द असलेल्या आरती यांना पुढे मुंबईला शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आईनं आपलं मंगळसूत्र देखील विकलं. |

आरती शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक ठिकाणी छोटी-मोठी नोकरी केली. त्यात त्यांनी डिग्रीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. यादरम्यान आईच्या इच्छेनुसार त्यांनी अर्जुन म्हाळसकर यांच्यासोबत विवाह करत संसार थाटला. अर्जुन यांना आरती यांच्यात शिक्षणाची जिद्द आणि चिकाटी दिसल्याने त्यांच्या पत्नीला प्रोत्साहन दिलं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यात सांगितलं.

PSI Arti Mhalaskar
Pune Latest News: पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमात गणपती अथर्वशीर्ष; विचारवंतांचा का होतोय विरोध?

घर-संसार आणि जबाबदारी सांभाळत आरती या रोज बारा-तेरा तास अभ्यास करायच्या. बघता-बघता आरती यांनी केलेल्या मेहनतीला यश आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि यात आरती उत्तीर्ण झाल्या. आता राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदावर (PSI) त्यांची निवड झाली आहे. काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द, मेहनत आणि आईसह पतीची मिळालेली साथ यामुळेच आरती आज पीएसआय झाल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com