Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut : शिवसेना कोणाची? निवडणूक आयोगाच्या निकालाआधी संजय राऊत रोखठोक बोलले

निवडणूक आयोगाच्या सुनावणी आधीच खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut News : खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबत आज म्हणजेच १७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. दुपारी ४ वाजता निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. या निवडणूक आयोगाच्या सुनावणी आधीच खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

मुंबईत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक आयोगाच्या आजच्या सुनावणीवर भाष्य केले. संजय राऊत म्हणाले, शिवसेना कोणाची हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित होत नाही. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. शिवसेना ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली असलेलीच शिवसेना आहे. शिवसेना एकच आहे'.

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर संजय राऊत म्हणाले, 'अडीज लाख कोटींची गुंतवणूक राज्यात होणार होती. ती आमच्या डोळ्यासमोर निघून गेली. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी परत आणण्यासाठी प्रयत्न केले नाही. उपमुख्यमंत्र्यांनीही परत आणण्यासाठी प्रयत्न केले नाही.

'दावोसला गुंतवणुकदारांची जागतिक जत्रा भरते. त्या जत्रेतून सव्वा लाख कोटी आणणार आहेत. ते आल्यावर आम्ही बोलू. त्या उद्योगांची पायाभरणी होईल. लोकांना त्यातून रोजगार मिळेल. तेव्हा आम्ही त्यावर मत व्यक्त करू. त्यांना यश आलं असेल, तर त्यांचं स्वागत करू, असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले, 'जम्मू काश्मीरला जाणार आहे. काश्मीरी पंडितांना भेटणार आहेत. तिकडे काश्मीरी पंडितांचे तीन महिन्यांपासून धरणे सुरू आहे. त्यांना भेटणार आहेत. तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

SCROLL FOR NEXT