BJP News : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे सोमवारी पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत भाजप नेत्यांना मार्गदर्शन केले. 'भाजपची कमी ताकद असलेल्या ७२ हजार बुथवर फोकस करा, अशी महत्वाची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना दिली. (Latest Marathi News)
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत भाजपच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक दिल्ली होत आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. पहिल्या दिवशीच्या बैठकी अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य रोड शो झाला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल चौक ते बैठकीच्या ठिकाणादरम्यान भव्य रोड शो केला.
पहिल्या दिवशीच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी भाजपची कमी ताकद असलेल्या 72 हजार बुथवर फोकस करा, अशा सूचना दिल्या. तर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येणाऱ्या सर्व ९ राज्यातील विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक भाजप जिंकणार, असा दावा भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला.
तसेच कर्नाटक, त्रिपुरा, नागालॅड आणि मेघालयाच्या भाजपा प्रदेश अध्यक्षांनी आपला अहवाल पक्षाध्यक्षांना दिला. बैठकीत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राजकीय प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधक अभद्र भाषेचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच या बैठकीत गुजरात निवडणूकीच्या फॉर्म्युलावर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राजस्थान, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, तेलंगाना आणि मिझोरमचे भाजपप्रदेशाध्यक्ष मंगलवारी म्हणजे आज आपला अहवाल पक्षाध्यक्षांना सुपूर्द करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातच्या निवडणूकीसाठी अभिनंदनाचा प्रस्ताव होऊ शकतो. जे पी नड्डा यांचा कार्यकाल वाढवला जाण्याची शक्यता. 2024 लोकसभा निवडणूकीची रणनीती ठरणार आहे. 2023 मधील 10 राज्यांच्या विधानसभा निवडणूकांवर चर्चा होऊ शकते.
त्रिपुरा, नागालॅड, मेघालय, कर्नाटक, मिझोरम, छत्तीसगढ, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगाना आणि जम्मू-कश्मीर या राज्यात होणाऱ्या निवडणूकांवर वेगळं मंथन केलं जाण्याची शक्यता आहे. निवडणूकीच्या दृष्टीकोणातून नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार आहे.
या राज्यात लोकसभेच्या एकूण जागांपैकी 17 टक्के जागा आहेत
राजस्थान: 25 जागा
मध्यप्रदेश 29 जागा
छत्तीसगढ 11 जागा
कर्नाटक 28 जागा
तेलंगना 17 जागा
जम्मू कश्मीर 6 जागा
त्रिपुरा 2
मेघालय 2
नागालॅंड 1
मिझोराम 1
एकूण जागा...93
भाजपची ताकद नसलेल्या मतदारसंघासाठी रणनीती ठरणार आहे. जी 20 देशाचं नेतृत्व भारत करत आहे. त्या संदर्भात चर्चा होणार आहे. राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांचा कार्यकाल वाढवला जाऊ शकतो.
छत्तीसगढ निवडणूकीसाठी धर्मांतराचा मुद्दा महत्त्वाचा करण्याचं नियोजन करण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूकीची जबाबदारी केंद्रीय मंत्री बीएल संतोष यांच्यावर दिली जाऊ शकते. कर्नाटक निवडणूकीत आरएसएसचा रोल महत्त्वाचा राहणार आहे. भाजपची ताकद ज्या लोकसभेच्या 160 जागांवर कमी आहे. त्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करण्याचं उद्दीष्ठ ठरवलं जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.