mp amol kolhe criticizes sujay vikhe saam tv
मुंबई/पुणे

Amol Kolhe News : त्यावेळी तुमचं तोंड संसदेत का उघडलं नाही? अमोल कोल्हेंचा सूजय विखेंना सवाल

अद्याप आपल्याला त्यांना अजित पवार मित्र मंडळ असे म्हणावे लागेल असेही काेल्हेंनी नमूद केले.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News :

आयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचे मंदिर (ayodhya ram mandir) होतंय म्हणून तुमच्या भागातील लोकप्रतिनिधी साखर वाटत आहेत. मात्र ते ज्या वेळेला साखर वाटायला येतात तेव्हा त्यांना आधी हा प्रश्न विचारा की, केवळ साखर देऊन आमची तोंड बंद करण्यापेक्षा जेव्हा कांद्याची निर्यात बंदी सरकारने लादली तेव्हा तुमचं तोंड संसदेत का उघडलं नाही? असे म्हणत खासदार अमोल कोल्हे (mp amol kolhe) यांनी भाजप खासदार सुजय विखे पाटील (mp sujay vikhe patil) यांच्यावर निशाणा साधला. अहमदनगरच्या पिंपळगाव माळवी येथे विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्राचे 48 खासदार आहेत, त्यापैकी उद्धव ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नऊ खासदार आहेत. बाकीचे भाजपचे, शिंदे गटाचे आणि अजित पवार मित्र मंडळाचे 39 खासदार आहेत. हे 39 खासदार कांदा निर्यात बंदीवर का बोलले नाही असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. (Maharashtra News)

यावेळी काेल्हे यांनी अजित पवार गटाचा (ajit pawar faction) उल्लेख त्यांनी अजित पवार मित्र मंडळ केला. ते म्हणाले अद्याप निवडणूक आयोगाचा निकाल लागलेला नाही त्यामुळे पक्षाचे नाव घेता येणार नाही, त्यांना मित्रमंडळच म्हणावा लागेल असा टोला त्यांनी लगावला.

एकीकडे मागच्या आठ ते दहा महिन्यांमध्ये दुधाचे दर पाडून त्यांनी शेतकऱ्यांच्या खिशातून करोडो रुपये काढून घेतले. आता काय त्यांनी करोडोची साखर वाटली का? असा सवाल करत खासदार अमोल कोल्हे यांनी हिशोब मांडत खासदार विखेंना चिमटा काढला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT